Obscene Remark On PM Narendra Modi Viral: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एक व्यंग चित्र व्हायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारतीय सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदींना ‘नेकेड किंग’ म्हणजेच ‘नग्न राजा’ घोषित केले आहे. अत्यंत गंभीर टीकेचा हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती व त्यामागील तथ्य आपण जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
फॅक्टक्रेसेंडॉने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल पोस्टमध्ये ‘द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचे कात्रण दिसत आहे. बातमीमध्ये लिहिले होते की, “भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की, ‘राजा नग्न आहे,’ (मोइजी, ज्यांना फेकू देखील म्हटले जाते) भारताच्या मुख्य न्यायमूर्तींच्या दबावाखाली SBI ला भारतातील सर्वात मोठ्या राजकीय माफिया, ऑरेंज कलर्ड ब्लूचा पर्दाफाश करणाऱ्या निवडणूक रोख्यांचा डेटा जाहीर करावा लागला.”
हे ही वाचा<< पंतप्रधान मोदींनी शेअर केला स्वतःच्या डान्सचा Video; नेटकरी थक्क; म्हणाले, “हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या कानशिलात..”
तपास:
सर्वप्रथम अशी कोणती बातमी द न्यूयॉर्क टाइम्सने दिली असती तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही बातमी माध्यमांमध्यवर आढळली नाही. तसेच व्हायरल कात्रणमध्ये लिहिण्यात आलेली बातमी द न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखन शैलीप्रमाणे नाही आणि वृत्तात ही एक ‘व्यंग आवृत्ती’ असल्याचे सांगितले आहे. व्हायरल कात्रण पाहिल्यावर कळते की, हे कात्रण १५ मार्च २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. हा मुद्दा धरून सर्च केल्यावर आमच्या लक्षात आले की, द न्यूयॉर्क टाइम्सच्या अधिकृत वेबसाईटने १५ मार्च रोजी प्रकाशित केलेले वृत आणि व्हायरल कात्रण वेगवेगळे आहे.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ वृत्तपत्राला एडिट करून खोटी बातमी पसरवली जात आहे.
निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल बातमी खोटी असून द न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तपत्राचे कात्रण एडिट करून खोट्या दाव्यासह बातमी पसरवली जात आहे.
हे ही वाचा<< Video: उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितलं मोदींसाठी मत? म्हणाले, “काँग्रेसकडे एक तरी चेहरा..”, ‘ही’ सभा कधी झाली?
(ही कथा सर्वात आधी फॅक्टक्रेसेंडॉने प्रकाशित केली असून शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)
अनुवाद : अंकिता देशकर