अंकिता देशकर
Narendra Modi Wears Muslim Skull Cap: लाईटहाऊस जर्नालिज्मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. मोदी यांनी इजिप्तच्या दौऱ्यावर असताना मुस्लिम धर्मात वापरली जाणारी ‘ गोल टोपी’ घातली आहे असे दर्शवणारा हा फोटो आहे. ,अमेरिका दौऱ्यानंतर मोदी यांनी इजिप्तमध्ये दुसऱ्या दिवशी फातिमिया काळातील या शिया मशिदीला भेट दिली. तेथे त्यांचे स्वागत इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी केले होते. सध्या व्हायरल होणारा फोटो व मोदींची मशिदीला भेट या योगयोगाने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण यामागील नेमकं सत्य काय हे लाईटहाऊस जर्नालिज्मने शोधून काढले आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर युजर vino ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.
बाकी युजर देखील हे फोटो शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून आमच्या तपासाची सुरुवात केली. आम्हाला हा फोटो Justice Mirror च्या वेबसाईट वर आढळून आला.
आर्टिकल चे शीर्षक होते, ‘Aljamea-tus-Saifiyah new Campus inaugurated by PM Modi’ हे आर्टिकल फेब्रुवारी ११, २०२३ रोजी अपलोड करण्यात आले होते.
लेखात नमूद करण्यात आले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील मरोळ येथे अल्जामिया-तुस-सैफीयाह (द सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी येथे ‘टोपी’ घातलेली दिसले नाही. हा फोटो, व्हायरल फोटोशी मिळता जुळता होता त्यामुळे इजिप्तमधला म्हणून सांगितला जाणारा हा फोटो एडिट केलेला आहे हे स्पष्ट होते.
आम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल काही बातम्या अजून सापडल्या.
रिपोर्ट मधील एकाही फोटोमध्ये पंतप्रधान मोदींनी ‘टोपी’ घातलेली दिसली नाही.
आम्हाला, The Dawoodi Bohras या युट्युब चॅनेल वर त्याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ अपलोड केलेला सापडला. इथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टोपी’ घातलेली दिसली नाही.
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यात ‘टोपी’ घालून दिसल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. चित्र मॉर्फ केलेले आहे आणि मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमातील आहे.