आतापर्यंत अनेक अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत. आपल्या एका चुकीमुळे आपला जीव गमावू शकतो हे माहित असूनही अनेक लोक आपला जीव धोक्यात टाकतात. रेल्वे स्थानकावर, रेल्वे रुळावर किंवा रेल्वे गाड्यामध्ये डान्स, स्टंट किंवा जीव धोक्यात येईल असे कृत्य करू नये असे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जाते तरीही लोक पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे ज्यामध्ये महिला रेल्वे रुळावर झोपलेली दिसत आहे आणि तिच्या अंगावरून रेल्वे धावताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

हेही वाचा –Video :”फास्टफूडसमोर चटणी भाकरी ठरली सरस!”, ७५ वर्षाच्या आजी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पटकावला तृतीय क्रमांक

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा नक्की काय घडले?

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका रेल्वे रुळावरून भरधाव वेगाने धावत आहे. रेल्वे रुळाच्या मधोमध एक महिला झोपलेली दिसत आहे तिच्या अंगावरून मालगाडी धावत आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेला थोडे सुद्धा खरचटत नाही. हा व्हिडिओ तेलंगनातील विकाराबाद जिल्ह्यातील नवदंगीमधीले स्थानकावरील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या मैत्रिणीबरोबर रुळ ओलांडत होती तेव्हा तिचा पाय सटकला आणि तिथे रुळावर पडली. तेवढ्यात तिथे मालगाडी येताना पाहून महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून राहिली. जोपर्यंत मालगाडी जात नाही तोपर्यंत महिला रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून होती, तिने कसलही हालचाल केली नाही. महिलेने आपले डोके देखील वर करत होती पण तेथे उभे असलेल्या व्यक्तीने तिला असे करण्यास मनाई केली. व्यक्तीचा सल्ला ऐकून महिला शांतपणे तिथेच झोपून राहिली. मालगाडी निघून गेल्यानंतर उठून उभी राहिली आणि त्यानंतर आपल्या मैत्रिणीला जाऊन भेटली. सुदैवाने महिलेला या अपघातात कोणतीही दुखापत नाही झाली.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकला वादक सज्ज! छोटासा ढोल कंबेरला बांधून करतोय वादन, पाहा Video Viral

अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी देखील अनेकदा लोक रेल्वे रुळ ओंलाडताना अडकल्याच्या घटना समोर आल्या आहे. गेल्या वर्षी देखील असाच एक अपघात झाला होता जेव्हा एक महिला आपल्या दोन मुलांबरोबर फ्लॅटफॉर्मवरून खाली पडली होती. फ्लॅटफॉर्मवरून पडल्यानंतर महिला आपल्या मुलांना घेऊन खाली बसून राहिली तेवढ्यात त्यांच्या अंगावरून ट्रेन धावत गेली. पण तिघांनाही कोणतीही दुखापत झाली नव्हती.

Story img Loader