अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या नवर्षाच्या कॅलेंडरवर यंदा भारतीय मुलांनी वर्चस्व गाजविले आहे. नासाचं यंदाचं कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयाला वाहिलेलं आहे.  अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कमर्शियल क्रू प्रोग्राम २०१९ साठी चिल्ड्रन आर्ट वर्क असलेले कॅलेंडर लाँच करण्यात आले आहे. या कॅलेंडरच्या कव्हरपेजसाठी उत्तर प्रदेशातील ९ वर्षाची चिमुरडी दीपशिखा हिचे चित्र निवडले गेले आहे. या कॅलेंडरच्या १२ महिन्याच्या पानांवर लहान मुलांची चित्रे पाहायला मिळणार असून त्यातील चार भारतीय मुले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्रातील इंद्रयुध आणि श्रीहन यांची चित्रेही यात असून हे दोघे १० आणि ८ वर्षाचे आहेत. तर थेमुकिलिअन या तमिळनाडूतील १२ वर्षाचा मुलाचे चित्र या कॅलेंडर मध्ये समाविष्ट केले गेले आहे. या चित्रांसाठी अंतराळ विज्ञान हा विषय दिला गेला होता. दिपशिखाने अंतराळवीर आणि पृथ्वीवरील माणूस यांच्या संवादाचे चित्र रेखाटले तर इंद्रयुधने अंतराळात राहणे आणि काम करणे यावर तसेच थेमुकिलिअन याने स्पेस फूड यावर चित्र रेखाटले आहे.