NASA Orion Captures Riveting Image Of Earth: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने अंतराळात पाठवलेल्या ‘ओरियन’ यान नुकतेच चंद्राच्या जवळून गेलं. चंद्रापासून १३० किमी अंतरावरुन या यानाने सोमवारी सायंकाळी भारतीय वेळेनुसार सहा वाजून २७ मिनिटांनी उड्डाण केलं. १६ नोव्हेंबर रोजी अवकाशामध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ‘ओरियन’ने पहिल्यांदाच चंद्राच्या इतक्या जवळून उड्डाण केलं आहे. आर्टीमिस वन मोहिमेअंतर्गत ‘ओरियन’ आता डिसेंट रेट्रोगेट ऑर्बीट म्हणजेच डीआरओमध्ये प्रवेश करणार आहे. हा या मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाच्या लाइव्ह ‘ओरियन’ ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २ लाख ७० हजार किलोमीटर अंतरावरुन या यानाने उड्डाण केलं. हे उड्डाण ७ हजार ८०० किलोमीटर प्रती तास वेगाने झालं. नासाच्या या मोहिमेदरम्यान हे यान जेव्हा चंद्राच्या मागील बाजूस होते तेव्हा त्याचा संपर्क तुटला होता. जवळजवळ ३० मिनिटं हे यान संपर्कामध्ये नव्हतं. मात्र नंतर या यानाशी संपर्क झाला. अपोलो १७ मोहिमेनंतर पहिल्यांदाच माननिर्मित यान एवढ्या लांबपर्यंत पोहोचलं आहे. या यानाने पाठवलेला पृथ्वीचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.

या यानाचा पुन्हा संपर्क झाल्याने यानाने पृथ्वीचे काही फोटो पाठवले आहेत. ‘ओरियन’वरील विशिष्ट कॅमेरांच्या माध्यमातून हे फोटो काढण्यात आले आहेत. या यानामध्ये एक पुतळाही ठेवण्यात आला आहे. या पुतळ्याला अंतराळवीर घालतात तसा विशेष सुट घालण्यात आला असून अंतराळवीर प्रत्यक्षात चंद्रमोहिमेवर जातील तेव्हा नेमका काय परिणाम होणार याचा यामधून अभ्यास करता येणार आहे. अपोलो ११ मोहिमेदरम्यान निल आर्मस्ट्रॉग आणि बझ अॅल्ड्रीन हे दोन्ही अंतराळवीर चंद्रावरील ज्या ट्रान्सकॉलिटी बेसवर उतरले होते तिथून काही अंतरावरुन ‘ओरियन’ यान गेलं.

पुढील सहा दिवसांमध्ये आता ‘ओरियन’ यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये प्रवेश करुन मोहिमेचा पुढला टप्पा पूर्ण करणार आहे. त्यानंतर हे यान ११ डिसेंबर रोजी पृथ्वीवर पुन्हा दाखल होईल. हे यान पॅसिफिक महासागरामध्ये उतरवलं जाणार आहे.