अंतराळ संस्था नासाचे इंस्टाग्राम हँडल हे अंतराळासंबधीत गोष्टींमध्ये रुची असणाऱ्यांसाठी कोणत्याही व्यक्तीसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. अवकाशात टिपलेली आगळे- वेगळे फोटो आणि व्हिडीओ संस्थेच्या इंस्टाग्राम खात्यावर सहज पाहता येतात. नुकतेच नासाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये आपली पृथ्वी पूर्णपणे वेगळ्या दृष्टीकोनातून दर्शविली आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
नासाने शेअर केला पृथ्वीचा टाईम्स लॅप्स व्हिडीओ
नासाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पृथ्वीचा टाईम्स लॅप्सव्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, चला बघू या आपली पृथ्वी कशी फिरते.
पृथ्वीचा सुंदर आणि प्रेरणादायी पाहण्याची दुर्मिळ संधी
आपल्या ग्रहाला संपूर्ण भिन्न दृष्टीकोनातून पाहण्याच्या दुर्मिळ संधीसाठी पृथ्वीच्या कक्षेत गेलेले लोक सांगतात की, ”जेव्हा ते २४० मैलांवरून पृथ्वीकडे पाहतात तेव्हा अंतराळातील हा निळा संगमरवर खरोखरच सुंदर आणि प्रेरणादायी दिसतो. कल्पना करा की, तुम्ही केबिन क्रू आहात आणि तासाभराच्या विश्रांतीमध्ये तुम्हाला खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता मिळू शकतो का, जणू हे जग, अक्षरशः, जवळून जात आहे असा भास होतो.”
तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहा.
हा अल्ट्रा हाय डेफिनेशन व्हिडीओ स्पेस स्टेशनच्या एक्सपिडिशन ६७ आणि ६८ ने मार्च २०२३ आणि मार्च २०२३ दरम्यान कॅप्चर केला होता. ISS पृथ्वीला १०९ किमी उंचीवर प्रदक्षिणा घालत आहे. ते ९० मिनिटांत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते.
आश्चर्यकारक दृश्य पाहून लोकांनी मानले नासाचे आभार
नासाच्या या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली असून, लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत.हे आश्चर्यकारक दृश्य दाखवल्याबद्दल नासाचे आभार मानताना एका यूजरने लिहिले, ”मोहक दृश्य, मला माझ्या डोळ्यांनी ते पाहता आले असते.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘मी पाहिलेला सर्वात सुंदर दृश्य, काय हा टाईम लॅप्स आहे?, कारण पृथ्वी 250 मैलांवरून खूप वेगाने फिरताना दिसत आहे.
आणखी एकाने म्हटले की, ”आपल्या पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागात गडगडाटी वादळे पाहिले. हे दृश्य मला आवडले.” तर दुसरा म्हणाला, ”अविश्वसनीय, ही सुंदर दृश्ये दाखवल्याबद्दल आभारी आहे.” अजून एकाने म्हटले की, ”पृथ्वी अविश्वसनीय आहे. तो एक भव्य आणि अतिवास्तव ग्रह आहे!”
काही दिवसांपूर्वी नासाने जेम्स वेब टेलिस्कोपने शेअर केलेला फोटो पोस्ट केला होता. आश्चर्यकारक फोटोमध्ये Arp 220 नावाचा खगोलीय दृश्य कैद केले होते, जे एक अल्ट्रा-ल्युमिनियस इन्फ्रारेड आकाशगंगा (ULIRG) आहे, जी एक ट्रिलियन सूर्याहून अधिक प्रकाशाने चमकते.