Shocking accident video nashik: भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. असाच एक प्रकार नाशिक रेल्वे स्थानकावर घडलाय. नाशिक स्थानकावर उतरणाऱ्या एका महिलेचा तोल गेला आणि ती खाली पडली. या सर्व घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

एक्स्प्रेसच्या चाकाखाली डोकं जाणार

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला नाशिक स्थानकावर ट्रेन थांबायच्या आधीच उतरायच्या प्रयत्नात तोल जाऊन खाली पडते. यावेळी ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधल्या अंतरामध्ये अडकते आणि फरफटत पुढे जाते.तिला उतरताना स्थानकावर स्थिर उभ राहणं जमलं नाही. तिचा तोल गेला आणि ती फरफटत चालली होती. अशावेळी काहीही घडू शकलं असतं. यावेळी एक्स्प्रेसच्या चाकाखाली डोकं जाणार इतक्यात ही घटना जवळच असलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षकांने पाहिली. त्यांनी महिलेच्या दिशेने वाघासारखी झेप घेतली. महिलेचं डोकं ट्रेनखाली जाणारच होतं इतक्यात त्याने तिला मागे खेचलं. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. नशिब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

काळजाचा ठोका चुकवणारी घटना

पूजा गोसावी असं या महिलेचे नाव असून ती आता सुखरूप आहेय पूजा ही मनमाड येथील हनुमान नगर येथे राहणारी आहे. रेल्वे पोलीस असलेले योगेश गव्हाड आणि खंडू गोलवड प्रवासी महिलेला प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये पडण्यापासून वाचवलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: संभाजीनगरच्या अपघाताची पुनरावृत्ती; नसतं धाडस अंगलट आलं, एक चूक अन् भीषण अपघाताचा थरार

@ians_india नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. त्या रेल्वे पोलिसांंचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता असा हलगर्जीपणा करत जीव धोक्यात घालतात.

Story img Loader