Viral Video : सोशल मीडियावर मजेशीर पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हल्ली रिक्षा, ट्रक, दुचाकी आणि कारवरील मेसेज सुद्धा जोरदार व्हायरल होताना दिसून येतात. हे मेसेज कधी भावुक करणारे असतात तर कधी थक्क करणारे असतात. कधी हे मेसेज पोट धरून हसवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका व्यक्तीने त्याच्या कारच्या मागील काचेवर मजेशीर मेसेज लिहिलाय. त्याने या मेसेजमध्ये पत्नीचा उल्लेख केला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्यक्तीने नेमका कोणता मेसेज लिहिलाय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रसत्यावरून जाणारी एक पांढरी शुभ्र कार दिसेल. कारवर मोठ्या अक्षरात एल लिहिलेय म्हणजेच कारचालक आता गाडी शिकत आहे . पण कारच्या मागील काचेवर एक मेसेज लिहिलाय. या मेसेजने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गाडीवर लिहिलेय, “बायकोची कार” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. गाडीच्या नंबरप्लेटवरून तुम्हाला कळेल की कार नाशिकमधील आहे आणि हा कारचालक नाशिककर आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
driving_lover_9812 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बायको ची कार…….”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आता तिला लाडक्या बहिणीचे १५०० रुपये मिळणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “नाशिककरांचा नाद नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “बायको पुण्याची आहे वाटतं….” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर गाडीवरील मेसेज लिहिलेले असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका चालकाने त्याच्या गाडीच्या मागे लिहिले होते, “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला? कसं सांगू तिला की गाडी पुढं काही सुचत नाही मला” तर एका व्यक्तीने गाडीच्या मागे लिहिले होते, “घायल तो यहा हर परींदा है, लेकिन फिरसे जो उड सका वही जिंदा है! ” नेटकरी अशा मेसेजेसला खूप पसंती देतात.