Natin Marli Mithi Video: सोशल मीडियावर अनेक नवनवीन मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही. गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, बाया भुकेल्यान गं अशी गाणी व्हायरल होत आहे. अशात नटीनं मारली मिठी हे गाणंदेखील इंटरनेटवर तुफान व्हायरल होतंय. सध्या याच गाण्यावर काही मराठमोळ्या तरुणींनी डान्स केलाय आणि या डान्सची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
तरुणींचा भन्नाट डान्स (Natin Marli Mithi Dance Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणींचा डान्स पाहून तुम्हीदेखील नक्कीच कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये ७ मराठमोळ्या तरुणींनी नटीनं मारली मिठी या गाण्यावर धमादेकार डान्स परफॉरमन्स केला आहे.
सातही जणींनी मराठमोळा श्रृंगार केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. काहींनी सहावारी, काहींनी नऊवारी नेसून या गाण्याची शोभा वाढवली आहे. अगदी हुबेहुब डान्स स्टेप करत या तरुणींनी मार्केट जाम केलंय असं म्हणायला हरकत नाही. तरुणींचा डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे आणि भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
तरुणींच्या डान्सचा हा व्हायरल व्हिडीओ @danccing_diva या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “असा असतो मराठी मुलींचा दणका” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर तरुणींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “डान्स करता करता तुम्ही खूप एन्जॉय केलंय असं दिसतंय.” तर दुसऱ्याने “खूपच भारी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूपच छान डान्स केलाय तुम्ही सगळ्यांनी” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “तुमचा मराठमोळा अंदाज जगात लय भारी”