सोशल मिडीयावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्राण्यांच्या व्हिडीओची संख्या तशी जास्त असते. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स जास्त कमेंट्सही करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वाघ राष्ट्रीय महामार्गावर फिरताना दिसत आहे. रुबाबदारपणे राष्ट्रीय महामार्गावर चालत असलेल्या या वाघाचा व्हिडीओ छायाचित्रकार राज मोहन यांनी हा टिपला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये राष्ट्रीय महामार्गावर वाघ चालताना दिसत आहे. काही क्षणात तो वाघ उंच उडी घेऊन जंगलात निघून जातो. हा व्हिडीओ तामिळनाडूच्या वालपराई इथला आहे. व्हिडीओला “भारतात आणखी एक दिवस. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय प्राणी ” व्हिडीओ पोस्ट करताना आयएफयेस सुसंता नंदा यांनी लिहलं आहे.
(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)
(हे ही वाचा: VIDEO: ‘या’ व्यक्तीने फिल्मी स्टाईलमध्ये मृत्यूला हरवले, फक्त एक सेकंदाच्या फरकाने वाचले प्राण)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
राज मोहन यांनी टिपलेला हा व्हिडीओ सोमवारी ट्विटरवर शेअर केला आहे. नंतर भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून तो शेअर केला. व्हिडीओला ४३,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.