अंकिता देशकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Actress Sai Pallavi Wedding: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक फोटो सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या लग्नाचे फोटो म्हणून ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. साई पल्लवी ही अनेकदा तिच्या नो- मेकअप लुकमुळे, भन्नाट डान्स व अभिनयामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिच्या अनेक चाहत्यांनी या पोस्ट व्हायरल करताना आमचं हार्टब्रेक झालं असंही म्हटलं आहे, खरंच तिने लग्न केलंय का व नेमकी कशामुळे ही चर्चा सुरु झाली आहे या सगळ्याचा आढावा घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
Sai Pallavi Fandom, एका फेसबुक पेज ने व्हायरल पोस्ट शेअर केले.
इतर युजर्सही पोस्ट शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हायरल इमेजवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. हेच चित्र आम्हाला ottplay.com वरील लेखात सापडले.
लेखातील तपशील आणि कॅप्शनद्वारे आम्हाला कळले की अभिनेत्री सई पल्लवीबरोबर दिसत असलेली व्यक्ती राजकुमार पेरियासामी आहे. आम्हाला कळले की राजकुमार पेरियासामी हे दिग्दर्शक असून त्यांचे थुप्पाक्की, SK21 आणि रंगून या चित्रपट चांगलेच गाजले होते. त्यांचे लग्न झाले आहे.
राजकुमार पेरियासामी यांच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मूळ फोटो दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी मे महिन्यात साई पल्लवीच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर शेअर केला होता.
Happy birthday dear @Sai_Pallavi92
— Rajkumar Periasamy (@Rajkumar_KP) May 9, 2023
You are the best and May God bless you with everything that’s best as always! I feel blessed to have you too by my side in this! Thank you for being there! #HappyBirthdaySaiPallavi pic.twitter.com/XTn2980ZjQ
आम्हाला ख्रिस्तोफर कनागराज यांचे एक ट्विट देखील आढळले ज्याने सांगितले की व्हायरल चित्र SK21 साठी करण्यात आलेल्या पूजेचे आहे.
गुगल सर्च वापरून आम्ही साई पल्लवी विवाहित आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला यासंबंधी कोणतीही विश्वासार्ह बातमी आढळली नाही.
आम्ही साई पल्लवीचे अधिकृत सोशल मीडिया हँडल देखील तपासले आणि तिच्या लग्नासंबंधी कोणतीही पोस्ट आढळली नाही.
दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी २९ मे २०१८ रोजी चेन्नईच्या श्री वराहम हॉलमध्ये जसविनीशी लग्न केले. लग्नाच्या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
निष्कर्ष: अभिनेत्री साई पल्लवीने लग्न केलेले नाही. व्हायरल फोटो हा SK21 या चित्रपटासाठी केलेल्या पूजेचा आहे ज्यात दिग्दर्शक राजकुमार पेरियासामीसह साई दिसत आहे.