आई वडिलांचं आपल्या मुला-बाळांवर जितकं प्रेम असतं. ज्याची सर दुसऱ्या कोणत्याही नात्याला येऊ शकत नाही, खास करुन वडिलांचे आपल्या मुलीवर अधिक प्रेम असते, तर आईची मुलावर अधिक माया असते, यात मुलगी घरची शान असते तर मुलगा आई-वडिलांचा अभिमान असतो. यात आपल्या देशात मुलगा- मुलगी समान असे धोरणं आहे. त्यामुळे मुलींचा ज्याप्रमाणे सन्मान होते त्याप्रमाणे मुलांचाही व्हावा अशी इच्छा असते. अखेर आज मुलांचा सन्मान करण्याचा दिवस आला आहे. दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय पुत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपल्या कुटुंबातील प्रत्येक मुलाचा सन्मान केला जावा असा उद्देश असतो.

राष्ट्रीय पुत्र दिवस का साजरा केला जातो?

२०१८ मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पुत्र दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाची स्थापना जिल निको यांनी केली. आजच्या जगात पालकांना मुलींप्रमाणे मुलांच्या संगोपनाचे महत्व समजावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. मुलगा आपल्या आई- वडिलांना, कुटुंबाला कोणत्याही परिस्थिती सांभळण्यासाठी प्रयत्न करतो, वेळेप्रसंगी कुटुंबाचे रक्षण करतो. घरातील मुलगी लग्न करून जेव्हा सासरी जाते त्यानंतर आई – वडिलांना मुलाचा एक मोठा आधार असतो. वृद्ध वयात मुलगा आपला सांभाळ करेल अशी प्रत्येक आई- वडिलांची अपेक्षा असते. याप्रमाणे अनेक मुलं आई-वडिलांना सांभाळतात. घरावर कठीण प्रसंग आला तर न खचता कुटुंबातील मुलगा सर्व परिस्थिती सावरून घेण्यासाठी झटतो. अशा प्रत्येक मुलाचा सन्मान या दिनानिमित्त झाला पाहिजे अशी अपेक्षा असते.

अगदी बालपणापासूनचं प्रत्येक आई-वडिलांनी मुलींप्रमाणे मुलांचे चांगले संगोपन केले पाहिजे. मुलींबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक समारंभ, कार्यक्रम घेतले जातात, त्याप्रमाणे मुलांसाठीही असे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलगी असो वा मुलगा दोन्ही कुटुंबासाठी तितकेच आपलेसे असतात, हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून भारतात दरवर्षी राष्ट्रीय पुत्र दिवस साजरा केला जातो. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या भावाला, मित्रांना काही खास भेट, शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करू शकता.

Story img Loader