केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी चेन्नईतील भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी भाजी खरेदी केली. तसंच तिथल्या दुकानदार आणि स्थानिक लोकांशी संवादही साधला. चेन्नईतील मैलापूर भागात निर्मला सीतारामन यांची खरेदी चर्चेचा विषय ठरली.
चेन्नईच्या दिवसभरातील दौऱ्यानंतर भाजीची केली खरेदी
अर्थमंत्री सीतारामन यांच्या कार्यालयाने ट्विट करून त्यांनी भाजी खरेदीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच केंद्रीय अर्थमंत्री काही भाजी विक्रेते आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करत असल्याचा फोटो देखील आहे. अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे की चेन्नईच्या त्यांच्या दिवसभराच्या भेटीदरम्यान श्रीमती @nsitharaman यांनी मैलापूर मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी केला.
( हे ही वाचा: आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली Scorpio- N कार; ट्विटरवर फोटो शेअर करत म्हणाले “चांगले नाव सुचवा…” लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)
स्थानिक विक्रेते आणि रहिवाशांशी संवाद
( हे ही वाचा: प्रेम कधीच म्हातारे होत नाही! थरथरत्या हातांनी पतीचा हात धरत तिने गायले गाणे….रुग्णालयातील हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा पाहाच)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन रताळे उचलताना दिसत आहेत. अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने शेअर केलेल्या छायाचित्रात त्या चेन्नईतील मैलापूर मार्केटमध्ये कारले खरेदी करताना देखील दिसत आहे. यावेळी त्यांनी विक्रेते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यापूर्वी त्यांनी चेन्नईतील अनेक कार्यक्रमांना हजेरी देखील लावली होती.