उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एका गावात रामलीलाच्या कार्यक्रमा दरम्यान हनुमानजीची भूमिका साकारणाऱ्या एका वृद्ध कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यावेळी त्या व्यक्तीची मुलगी आणि पत्नीही त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. आपल्या नवऱ्याचा समोर मृत्यू होताना पाहून बायको देखील रडू लागली. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे की लंका दहन दरम्यान वृद्ध व्यक्ती स्टेजवरून खाली पडली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फतेहपूर जिल्ह्यातील सलेमपूर गावात नवरात्रीनिमित्त देवी जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी रामलीलाचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ५० वर्षीय रामस्वरूप हनुमानाची भूमिका साकारत होते. जेव्हा लंकेला आग लावण्याची वेळ आली तेव्हा सुमारे एक मिनिटानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तो स्टेजवरून खाली पडला. व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, लंका दहन दरम्यान जेव्हा त्याच्या शेपटीला आग लागली तेव्हा त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. तो खाली पडताच सर्वजण तेथे धावून आले मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.
( हे ही वाचा: Video: कारचा दरवाजा अचानक उघडणे पडले महागात; दुचाकीस्वार थेट घुसला ट्रकमध्ये, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ)
लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान अशाप्रकारे झाला वृद्ध कलाकाराचा मृत्यू
( हे ही वाचा: Video: सिंहाच्या ताकदीपुढे हत्तीने टेकले गुडघे; जंगलाच्या राजाने केलेली ही भयानक शिकार एकदा पहाच)
पत्नी अनुसूयासह शेकडो लोकांनी रामस्वरूपचा मृत्यू होताना समोर पाहिले. त्यांना दोन वर्षांची मुलगी देखील आहे. गावप्रमुख गुलाब यांनी सांगितले की, रामस्वरूप छोटी मोठी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. पतीच्या निधनानंतर पत्नी व मुलांची अवस्था बिकट आहे.