Viral Video : सध्या सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होईल. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होते त्यामुळे याला शारदीय नवरात्री सुद्धा म्हणतात.
नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसात सगळीकडे पुजापाठ, कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. नऊ दिवस देवीच्या नावाने उपवास केला जातो.
अनेक जण या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे परिधान करतात. तुम्हाला यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग माहीत आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या नऊ रंगाविषयी सांगितले आहेत.
या व्हिडीओमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग सांगितले आहेत.
३ ऑक्टोबर – पिवळा रंग
४ ऑक्टोबर – हिरवा रंग
५ ऑक्टोबर – करडा रंग
६ ऑक्टोबर – केशरी रंग
७ ऑक्टोबर – पांढरा रंग
८ऑक्टोबर – लाल रंग
९ ऑक्टोबर – निळा रंग
१० ऑक्टोबर – गुलाबी रंग
११ ऑक्टोबर – जांभळा रंग
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
bappa_maza_moryaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रंगाचा आणि नवरात्रीचा काहीही संबंध नाही” तर एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद, मी शोधतच होते आणि व्हिडीओ समोर आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवरात्रीचे नऊ रंग, खूप चांगला अनुभव आहे.” एक युजर लिहितो, “माझ्याकडे या प्रत्येक रंगाची साडी आहे.”
हेही वाचा : मुस्लीम तरुणांकडून टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर दमदाटी अन् तोडफोड; व्हिडीओ खरा; पण नेमका कुठला? वाचा सत्य घटना
शारदीय नवरात्रीचे महत्व
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, त्यामुळे देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची नऊ दिवस पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात तुम्ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना भेट देऊ शकता. माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवातील भक्त येथे देवींच्या दर्शनासाठीद दुरवरून येतात.