गणेशोत्सवानंतर ज्या उत्सवाची प्रतीक्षा असते तो म्हणजे नवरात्रोत्सव. देशभरात अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. येत्या २९ सप्टेंबरपासून देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. गुजरातमध्येही अगदी धुमधडाक्यात नवरात्र साजरी केली जाते. बदलत्या वर्षानुसार नवरात्रीतील मेहेंदीचा असेल किंवा कपड्यांचा ट्रेंड असेल तो बदलत असतो. यावेळी नवरात्रातीपूर्वीच सर्वाधिक चर्चा सुरू झालीये ती म्हणजे टॅटूंची. अहमदाबादमध्ये निरनिराळ्या सामाजिक संदेशांसह अंगावर टॅटू काढण्याचे प्रकार सध्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


दरम्यान, या टॅटूंवरही हाऊडी मोदी या कार्यक्रमाचा प्रभाव अधिक असल्याचं पहायला मिळत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचं उदाहरण सर्वांनीच पाहिलं. आता तरूण तरूणी टॅटूच्या माध्यमातूनही ही मैत्री दाखवण्यास सज्ज झाले आहेत.

तर दुसरीकडे देशभरात नुकताच नवा वाहतूक कायदा अंमलात आला. त्यामुळे हेल्मेट घालून दुचाकी चालववी असा संदेश देणारे टॅटूही पहायला मिळत आहेत.


तर काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याची स्तुती देशभरातून करण्यात आली होती. टॅटूच्याही माध्मयातून युवा वर्ग आपला आनंद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर प्लास्टिक बॅन असेल किंवा इस्रोची चांद्रयान-२ मोहीम असेल, हे सर्वच तरूण मंडळी टॅटूच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.