Navratri Wishes in Marathi : नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे.
पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. तुम्हाला नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात तुम्ही त्यांना खालील सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
“नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर पूर्ण होवोत तुमच्या सार्या मनोकामना”
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
हेही वाचा : नवरात्रीमध्ये मिळणार बक्कळ पैसा; केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
नवरात्रीचे हे नऊ दिवस आणि नऊ रात्री तुमच्यासाठी चांगले आरोग्य आणि भाग्य घेऊन येवो.
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
नारी तू नारायणी। नारी तू सबला।।
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी। नमितो आम्ही तुजला।। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशापासूनि सोडी तोडी भव पाशा
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ! दुर्गा माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा.
हेही वाचा : “भावांनो, उत्सव देवीचा आहे. सगळ्या महिलांमध्ये देवीच बघा” पुणेरी पाटी चर्चेत, Video Viral
“नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!”
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता,
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः
शुभ चैत्र नवरात्री
टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर,
आईच्या भक्तीचा जागर…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना… शुभ नवरात्री !
ज्या क्षणाची पाहत होतो वाट,
ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी,
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
शारदीय नवरात्री २०२४ तारीख आणि शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.