दिल्लीमधील ४० वर्षीय महिला रिक्षा चालक सुनीता चौधरी यांना सहकारी रिक्षा चालकानंच लुटलं आहे. मंगळवारी सकाळी मोहन नगरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. सुनीताकडील ३० हजार रूपये घेऊन रिक्षा चालक पसार झाला. सुनीता चौधी यांनी साहिबाबद पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तात्काळ तक्रार दाखल केली आहे.
सुनीता चौधरी मूळची मेरठची आहे. गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीच्या खिडकी एक्सटेंशन मालवीय नगरमध्ये राहते. मंगळवारी सुनीता मेरठवरून दिल्लीला पोहचली. मंगळवारी सकाळी दहा वाजता मोहन नगरमधून सनीता रिक्षामध्ये बसली. सुनीता जवळ दोन बॅग होत्या. त्या रिक्षामध्ये मागे ठेवण्यात आल्या. रिक्षा सुरू झाल्यानंतर काहीवेळातच चालकासोबत एक आणि मागे दोन प्रवासी बसले.
मोहन नगरच्या फ्लायओव्हरवर पोलिसांमुळे समोर बसलेल्या तरूणाला चालकानं मागे बसवले. वसुंधरा लाल बत्तीजवळ रिक्षा बंद पडल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी दुसरा रिक्षा घेण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी चालकानं रिक्षा सुरू केली आणि पसार झाला. सुनीताच्या बॅगमध्ये ३० हजार रूपये होते.
सीओ डॉक्टर राकेश मिश्र यांच्यानुसार, सुनीता रिक्षाची वाट पाहत होती. त्यावेळीच आरोपी रिक्षा चालू करून पसार झाला. रिक्षांमधील सुनीताच्या बॅगमध्ये तीस हजार रूपयांची रक्कम होती. सुनीतानं बसमध्ये बसून रिक्षाचा पाठलाग केला मात्र, रिक्षा पसार झाला होता. त्यानंतर सुनीतानं साहिबाबद पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली.