Viral Video : चाहते त्यांच्या आवडत्या व्यक्तींसाठी काहीही करू शकतात. तुम्ही आजवर अनेक चाहते पाहिले असेल जे त्यांच्या आवडत्या सिनेसृष्टीतील अभिनेते अभिनेत्रींसाठी वाट्टेल ते करतात. कोणी मंदिरे बांधतात तर कोणी त्यांना महागडे गिफ्ट देतात, कोणी त्यांना लेटर, फुलांचे बुके, ग्रीटिंग्ज भेटस्वरुप देतात तर कोणी अभिनेते अभिनेत्रींसाठी आगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. तुम्ही अभिनेता अभिनेत्रींसाठी हातावर टॅटू काढलेले अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण कधी कोणी एखाद्या नेत्याचा हातावर टॅटू काढलेला पाहिला आहे का?

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोलापुरच्या एका तरुणाने चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा टॅटू हातावर काढला आहे. पवारांच्या वाढदिवशी या तरुणाने हातावर टॅटू काढून त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Auto Driver: मुंबईत घर, व्यवसायाने एजंट तरीही छंद म्हणून चालवतात रिक्षा; तरुणीला गोष्ट सांगत दिला त्यांनी ‘हा’ सल्ला; पाहा VIDEO

कार्यकर्त्याने हातावर कायमस्वरूपी टॅटू गोंदवत अजित पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तरुणाने त्याच्या हातावर टॅटूच्या स्वरुपात अजित पवारांची प्रतिमा साकारलेली दिसत आहे. या प्रतिमेखाली मोठ्या अक्षरात ‘दादा’ असे लिहिलेय.

हा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मकरंद शिवशेट्टी असे या तरुणाचे नाव असून तो सोलापुरचा आहे. या तरुणाला अजित पवारांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यामुळे त्याने चक्क त्याच्या हातावर अजित पवारांचा टॅटू काढला. या कार्यकर्त्याने हातावर कायमस्वरूपी टॅटू गोंदवत अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा या तरुणाने अजित पवारांना हा टॅटू दाखवला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यकर्त्याचे आभार मानले आणि या तरुणाबरोबर फोटो सुद्धा काढला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्स यावर मिश्र प्रतिक्रिया देताना दिसले. काही लोकांना तरुणाची शुभेच्छा देण्याची हटके पद्धत आवडली तर काही युजर्सनी या वर टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: रस्त्यावरून धावत होत्या गाड्या अन् १० सेकंदांत कोसळलं भलंमोठं झाड, सावरायलाही मिळाला नाही वेळ; भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद

२२ जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. काही कार्यकत्यांनी त्यांना स्वत: भेट देऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.