लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकत आलोय ती म्हणजे आई वडिल आणि गुरू यांना कधीच विसरता कामा नये. तेव्हा या दोघांच्या चरणावर आपण नतमस्तक झालेच पाहिजे. आता कोवळ्या वयापासून आपल्यावर हे संस्कार होताहेत. ते सहजासहजी विसरणं शक्य थोडीच आहे. तेव्हा भारतीय देशात असोत की देशाबाहेर गुरू दिसले की त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घ्यायचे हे आपल्याला माहिती आहे. पण आपली ही संस्कृती अमेरिकेतल्या एका शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना मात्र माहिती नव्हती. तेव्हा कोणा भारतीयाने त्यांच्या चरणाला स्पर्श केलेला पाहून त्यांना धक्का बसला नसेल तर नवल.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिकागो विद्यापीठातला हा व्हिडिओ आहे. या विद्यापीठात दिक्षांत सोहळा सुरू होता. प्रमुख स्वत: विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते, जेव्हा एका भारतीय विद्यार्थांची वेळ आली तेव्हा आपल्या परंपरेनुसार त्याने प्रमुखांना वाकून नमस्कार केला. पण प्रमुख एवढे गोंधळले की त्याने नक्की काय केलं हे त्यांना समजलेच नाही. तेव्हा या गोंधळलेल्या अधिक्षकांचा आणि दिक्षांत सोहळ्याचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Indians will be Indians….pic.twitter.com/YVR94DzW2l
— Nikhil (@Trollacharya) May 19, 2017