‘इस इंडियन को निकालो’ असे सांगत एका भारतीय महिला पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर काढण्याची घटना पाक मीडिया ब्रिफिंगच्यावेळी घडली आहे. न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. संयुक्त राष्ट्राच्या सभेच्या आधी पाकिस्तानचे पराष्ट्र सचिवांची ही पत्रकार परिषद होती. यावेळीस अनेक पत्रकार उपस्थित होते. मात्र परिषदेला सुरूवात होण्याच्या आधी एनडीटीव्हीच्या एका महिला पत्रकाराला बाहेर जाण्यास सांगण्यात आले. एनडीटीव्हीची महिला पत्रकार नम्रता बरार हिने ‘इस इंडियन को निकालो’ असे सांगत आपल्याला बाहेर जाण्यास सांगण्यात आले असा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘संयुक्त राष्ट्राच्या सभेच्या आधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी इस इंडियन को बाहर निकालो असे सांगत मला बाहेर काढण्यात आले. पण मला यात काहीच आश्चर्य वाटत नाही. आता आपणसुद्धा असेच करायचे’ असा प्रकारचे ट्विट तिने केले. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण बाहेर आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यातून संयुक्त राष्ट्राच्या सभेत आपण काश्मीरचा मुद्दा उचलू अशी धमकी पाकने भारताला दिली होती. त्यातूनच उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबद्दल पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास साफ नकार दिला. पत्रकाराने याबद्दल त्यांना विचारले असते त्यांनी न ऐकल्यासारखे केले नंतर त्यांनी मात्र उत्तर देण्यास साफ नकार देला. पत्रकार नम्रता बरार हिच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर याची चर्चा झाली.