NEET Paper Leak Accused Arrested In Congress Office: लाइटहाऊस जर्नालिझमला एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असल्याचे लक्षात आले. यानुसार झारखंडच्या देवघर येथील काँग्रेस कार्यालयात लपून बसलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. संबंधित पोस्टमध्ये व्हिडीओ सुद्धा शेअर केला जात आहे. देशभरात नीट प्रकरण चर्चेत असताना नेमकी अशी कारवाई झालीये का हे जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास केला असता याबाबत काही तथ्य समोर आली आहेत.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Vivek Singh ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?

इतर वापरकर्ते देखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओच्या स्क्रीनग्रॅबवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला ANI च्या X हॅण्डलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, UGC NEET प्रकरणाशी संबंधित सहा आरोपींना LNJP हॉस्पिटल, पाटणा येथून नेण्यात आले. बिहार पोलिसांनी आरोपीला झारखंडच्या देवघर येथून अटक केली.

व्हायरल दाव्यासह दिसणारा व्हिडीओ एलएनजेपी रुग्णालयाचा आहे. गूगल मॅपवर शोधले असता, अपलोड केलेल्या फोटोजवरून असे दिसून आले की व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणेच ते ठिकाण आहे. यातून हे सिद्ध होते की व्हिडीओ एलएनजेपी हॉस्पिटल, पाटणा येथील आहे आणि काँग्रेस कार्यालयाचा नाही.

त्यानंतर ज्या ठिकाणाहून आरोपींना अटक करण्यात आली होती त्या ठिकाणाची पुष्टी करण्यासाठी आम्ही बातम्यांचे अहवाल तपासले. आम्हाला इंडिया टुडेवर एक अहवाल सापडला, ज्यामध्ये देवघरच्या एम्सजवळील घरातून अटक करण्यात आल्याचा उल्लेख आहे.

https://www.indiatoday.in/india/story/bihar-police-jharkhand-deoghar-paper-leak-malpractices-neet-exam-row-arrested-2556600-2024-06-22

टाईम्स ऑफ इंडियाच्या आणखी एका अहवालात उल्लेख आहे की, देवघरचे एसडीपीओ हृतिक श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी ५ मे रोजी संशयितांना देवीपूर परिसरातील झुनू सिंगच्या घरातून अटक केली आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/patna/bihar-cops-arrest-6-from-jkhand-in-neet-ug-leak-case-19-held-so-far/articleshow/111196136.cms

हे ही वाचा<< IRCTC वर तिकीट बुक करताना वेगळं आडनाव आढळलं तर ३ वर्षांची शिक्षा आणि १० हजार दंड? मध्य रेल्वेचं उत्तर वाचा

निष्कर्ष: देवघरमधील झुनू सिंगच्या घरातून नीट प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. काँग्रेस कार्यालयातून आरोपींना अटक करण्यात आली नाही. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader