तसे तर पालक त्यांच्या सर्व मुलांना समान प्रेम देतात. पण वडील आणि मुलीचं बाँडिंग आणि ट्युनिंग वेगळं आहे. या नात्यातील गोडवा घराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतो. या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वी एक वृत्त झळकले होते. सासरी त्रास सहन करणाऱ्या लेकीला बापाने वाजत-गाजत माहेरी आणले. सोशल मीडियावर या बापाचं जोरदार कौतुक झालं. आता, आणखी एका बापाने लेकीसाठी दिलेल्या परिक्षेची गोष्ट समोर आलीय. मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी बापानेही NEET परीक्षा दिली अन् आश्चर्यकारक निकाल समोर आला.

वडिलांनी ५० व्या वर्षी दिली परीक्षा

शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते, NEET ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक, मात्र खास आपल्या लाडक्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.खेतान यांनी NEET परीक्षेचा अर्ज भरला होता. प्रकाश खेतान हे प्रयागराजचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. प्रकाश खेतान यांची १८ वर्षांची मुलगी मिताली हिलाही त्यांच्याप्रमाणेच डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर वडिलांनी आपल्या मुलीला वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

अन् बाप जिंकला

आपल्या मुलीला प्रवृत्त करण्यासाठी डॉ. प्रकाश खेतान यांनी ठरवले की, ते स्वतःही या परीक्षेचा फॉर्म भरतील. याप्रमाणे त्यांनी वयाच्या ५० वर्षी NEET साठी अर्ज केला. त्यांनी अनेक दशकांनंतर पुन्हा वैद्यकीय पुस्तके वाचली आणि तयारी केली. दरम्यान, परीक्षेबाबतही ते एकमेकांशी चर्चा करत असायचे. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. निकाल लागला आणि एका टक्क्याने मुलीनं वडिलांपेक्षा पुढे गेली, मुलीला ९० टक्के गुण मिळाले तर डॉ. प्रकाश खेतान यांना ८९ टक्के गुण मिळाले. असं असलं तरी शेवटी बापच जिंकला.

हेही वाचा >> VIDEO: सगळं संपूनही डाव जिंकता येतो; कबड्डीचा थरार पाहून म्हणाल वाहह पठ्या मानलं तुला…

आपल्या मुलीच्या यशासाठी वडिलांनी उचललेले हे अनोखे पाऊल संपूर्ण यूपीमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet success story 54 year old engineer left high paying job to pursue mbbs cracked neet but with a twist srk