Mukesh -Neeta Ambani News: अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. अंबानींच्या कार्यक्रमात दिसणारा थाट पाहता त्यांच्या जीवनशैलीविषयी साहजिकच सर्वांना कुतुहल असते. अगदी एखाद्या कार्यक्रमात सुद्धा अंबानींच्या कुटुंबातील सदस्यांनी एंट्री घेतली की त्यांच्या कपड्यांपासून ते बॅगेपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या वस्तूंची चर्चा रंगतेच. अशा या श्रीमंत घरातील मुलं म्हणजेच ईशा, आकाश आणि अनंत अंबानींना लहानपणी साहजिकच हजारो रुपये पॉकेटमनी मिळत असेल असं तुम्हालाही वाटतं का? याविषयी स्वतः नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनंत अंबानी हे धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये होते. त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेल्या व वडिलांच्या मालकीच्या शाळेत शिकताना सुद्धा काही वेळा मुलं अनंत अंबानीला तू अंबानी आहे की भिकारी असं चिडवायचे. याची आठवण सांगताना, नीता अंबानी यांनी iDiva ला सांगितले की, जेव्हा त्यांची मुलं लहान होती तेव्हा त्यांना शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाऊ खाण्यासाठी त्या त्यांना दर शुक्रवारी ५ रुपये आम्ही द्यायचो”

“एकदा अनंत खोलीत आला आणि ५ रुपयांऐवजी १० रुपये मागितले. का असे विचारले असता अनंत अंबानीने सांगितले की, “शाळेतील सर्व मुले मला हसतात. जेव्हा मी खिशातून पाच रुपये काढतो तेव्हा ‘तू अंबानी आहेस की भिकारी आहेस?’ असं विचारतात. या गोष्टीवरून त्या स्वतः आणि मुकेश अंबानी सुद्धा हसले होते.”

हे ही वाचा<< अजित पवारांची संपत्ती किती? पत्नी सुनेत्रा पवारांच्या नावे २८ कोटींची प्रॉपर्टी, ६१ लाखाचे दागिने तर स्वतःकडे…

नीता अंबानी यांनी पुढे सांगितले की, लहानपणापासून मुलांना डाऊन टू अर्थ ठेवण्यासाठी त्या कॉलेजला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरायला लावत असे व मुलांना वर्षातून फक्त चार वेळा बाहेर फिरायला जाण्याची परवानगी होती. याच संस्कारात व शिस्तीत वाढलेल्या अनंत अंबानींची सध्या ४० बिलियन डॉलर्स इतकी एकूण संपत्ती आहे.