ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सवरुन वाद सुरु आहेत. चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असा प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. तर काहींनी या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकाने चित्रपटातील वादग्रस्त संवाद काढून टाकल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता लोकगायिका नेहा सिंह राठोडने एक गाणं रिलीज करत चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेहा सिंह राठोडने या गाण्याच्या माध्यमातून मनोज मुंतशीर यांचा खरपूस समाचार घेतला आहे, या गाण्यातून तिने म्हटलं आहे की, “राम नाम गहाण ठेवून खूप पैसा कमावला आहे, या लेखकाने नाव बुडवले आहे. जय श्री रामची घोषणा देवून जनतेची दिशाभूल केली आहे, मात्र यावेळी या पर्दाफाश होऊन चेहरा उघडा पडला आहे. तसेच राष्ट्रवादाच्या मागे लपून रामाचा सौदा केला आहे” अशा आशयाचे हिंदी गाणे तिने गायलं आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही पाहा- पत्ते खेळणाऱ्या मुलाची वडिलांनी चप्पलेने केली धुलाई; व्हायरल Video पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं झालं कठीण

धत्त तेरी की राइटर मऊगा..!

नेहा सिंह राठोडने गाण्यात म्हटलं आहे की, खरं सांगा, रामाच्या नावावर किती फंडिंग मिळालं आहे, तुम्ही रामायणासारख्या महाकाव्याची खिल्ली उडवली आहे. नेहाने या गाण्याचे नाव दिले आहे ‘धत्त तेरी की राइटर मऊगा’ असं ठेवलं आहे. सध्या तिने गायलेलं गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

नेहा सिंहचं गाणं व्हायरल होताच अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “त्यांचा कोणताही धर्म नसतो, फक्त पैसा असतो, मग तो कोणत्याही स्वरूपात मिळो.” @Imsaurav009 वापरकर्त्याने लिहिलं, “आज संपूर्ण भारत एकत्र उभा आहे आणि मनोज मुंतशीरचा विरोध करत आहे, आजपर्यंत जी एकजूट कोणीही करू शकले नाही ती मुंतशीरने केली.”

@ShekharMitr नावाच्या नेटकऱ्याने लिहिले, “आस्तिकांपासून नास्तिकांपर्यंत आणि उजव्यांपासून डाव्यांपर्यंत, संपूर्ण भारत मनोज मुंतशीरच्या विरोधात आहे.” तर आणखी एकाने लिहिलं की, मनोज मुंतशीरने आपली योग्यता दाखवली आहे. शिवाय एका वापरकर्त्याने तर मुंतशीरला लाज वाटत नाही का? असा संतप्त प्रश्न विचारला आहे. त्याने लिहिलं आहे, “माहित नाही मनोज मुंतशीरने इतके वाईट संवाद कसे लिहिले, सारे जग हसत आहे पण त्यांना लाज वाटत नाही.”

Story img Loader