Viral Neighbors fight video : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. कधी मारहाण, कधी मज्जा मस्करी, कधी वधू-वरांचा विचित्र डान्स काहीही व्हायरल होत असते. पण यावेळी इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्हाला प्रचंड हसवेल. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसायला लागाल. खरंतर, व्हायरल व्हिडिओमध्ये शेजाऱ्यांमधील भांडण दाखवले आहे, ज्यामध्ये छतावर भांडणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये असे काही घडते की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

शेजाऱ्यांची सुरु होते जोरदार भांडण, छतासह सर्वजण कोसळले

व्हायरल व्हिडीओमध्ये अगदी चित्रपटातील असल्यासारखा वाटत आहे. ८-१० लोक एकमेंकांबरोबर जोरदार भांडण करत आहे. एकमेकांना लाथा मारत आहे, बुक्या मारत आहे. ही मारामारी घराच्या छतावर सुरु आहे. कोणी एकमेकांना चपराक मारत आहे तर कोणी बुक्की मारत आहे. कोणी थांबायला तयार नाही. पण शेवटी असे काही घडते ज्याची शेजार्‍यांमधील भांडणादरम्यान घराच्या छत्ताला भगदाड पडते. छत्ताबरोबर काही लोकही खाली पडतात.

महिला पुरूषांशी भांडताना दिसत आहेत!

व्हिडिओमध्ये काही महिला पुरूषांच्या मानेला धरून त्यांच्याशी भांडतानाही दिसत आहेत. या अपघातात सर्व महिला छतासह जमिनीवर पडल्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. मात्र, हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

वापरकर्त्यांनीही उडवली खिल्ली

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या X अकाउंटने शेअर केला आहे, जो १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी व्हिडिओला लाइक देखील केले आहे. अशाप्रकारे, सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…पण हे लोक का भांडत आहेत. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… छत देखील यांच्या रोजच्या भांडणामुळे वैतागले होते, तर दुसऱ्याने लिहिले की, काय छत फोडणारे भांडण होते मज्जा आली.”