Nepal Plane Crash Viral Video: नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी खासगी विमान कंपनी सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले. यावेळी विमानात एकूण १९ जण होते. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. त्या व्हिडीओतून असा दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडीओ नेपाळच्या काठमांडूमधील नुकत्याच घडलेल्या विमान अपघाताचा आहे. त्यात विमान अक्षरश: जळून खाक झाल्याचे दिसतेय. पण, खरेच हा व्हिडीओ काठमांडू विमान अपघाताचा आहे का याचा तपास सुरू केल्यानंतर तपासात समोर आलेली माहिती जाणून घेऊ.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर DA News Plus ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
इतर सोशल मीडिया वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
व्हायरल व्हिडीओवरून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
पहिल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला इंडिया टुडेवरील एक बातमी आढळली.
रिपोर्ट १५ जानेवारी २०२३ रोजी अपलोड करण्यात आली होती.
अहवालात नमूद केले आहे: रविवारी पोखरा विमानतळाजवळ नेपाळच्या विमानाचे क्रॅश होण्यापूर्वी काही क्षणांतच हवेत नियंत्रण सुटल्याचे दृश्य समोर आले आहे. शेजारच्या इमारतीच्या टेरेसवरून चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये एटीआर-72 हे प्रवासी विमान क्रॅश होण्यापूर्वी ७२ जणांना घेऊन जाताना दिसत आहे.
More Fact Check Stories : मुंबईत रुळांवरून लोकल ट्रेन थेट चढली प्लॅटफॉर्मवर अन् लोकांनी मारल्या उड्या…; अपघाताच्या थरारक घटनेचा Video कधीचा? वाचा सत्य घटना
अहवालात पुढे म्हटले आहे : विमान काठमांडूवरून पोखरा येथे जात होते. जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान वाहणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावर असलेल्या जंगलात हे विमान कोसळले. विमानात एकूण ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश, दोन कोरियन, एक अर्जेंटिनी आणि एक फ्रेंच नागरिक होता.
आम्हाला याबद्दल अनेक बातम्यादेखील आढळल्या.
एका एक्स वापरकर्त्याने १५ जानेवारी २०२३ रोजी व्हिडीओ अपलोड केला होता.
आम्हाला असेही आढळले की, हा व्हिडीओ १५ जानेवारी २०२३ रोजी दार्जिलिंग क्रॉनिकल या फेसबुक पेजने अपलोड केला होता. (nepal plane crash video)
व्हिडीओबरोबर लिहिले होते की : TRAGIC :Plane Crash in Pokhara International Airport – Many feared dead A 72-seater passenger aircraft crashes on the runway at Pokhara International Airport in Nepal. Rescue operations are underway and the airport is closed for the time being. The Kathmandu post has reported, a total of 68 passengers & four crew members were on board the Yeti airlines aircraft that crashed between the old airport and the Pokhara International Airport, Sudarshan Bartaula, spokesperson of Yeti Airlines More details are awaited.
निष्कर्ष :
नेपाळमधील काठमांडू विमान अपघातापूर्वीचे अंतिम क्षण कॅप्चर केल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ हा जुना व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी नेपाळच्या पोखरामध्ये झालेल्या विमान अपघाताचा आहे. त्यामुळे विमान अपघाताच्या व्हायरल व्हिडीओसह केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.