सोशल मीडियावर कधी, कोणाला आणि कशी प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. कोणालाही रातोरात प्रसिद्धी मिळत नसली असे कितीही म्हटले तरी काही वेळा सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झालेले उदाहरणेही अनेक आहेत. पाकिस्तानच्या चहावाल्यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एक व्यक्ती खूपच चर्चेत आली आहे. ती म्हणजे नेपाळमध्ये राहणारी एक भाजीवाली. #tarkariwali हा हॅशटॅग वापरून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुपचंद्र महारन नावाच्या फोटोग्राफरने हा फोटो काढला आहे. सोशल मीडियावर हा फोटो अपलोड केल्यानंतर काही तासांतच तो फोटो व्हायरल झाला आहे. या नेपाळी भाजीवालीच्या अप्रतिम सौंदर्याने सगळ्यांनाच वेड लावले आहे. हिरवा कुडता घालून टॉमेटो विकणा-या या मुलीच्या दोन फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ही मुलगी कोण आहे याबद्दल फारशी माहिती समजली नाही पण तिच्या चर्चा मात्र खूपच रंगत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा