देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दिव्यांची रोषणाई, दारात रांगोळी, घरासमोर कंदील, दाराभोवती पणत्या असं दृश्य घरोघरी पाहायला मिळत आहे. भारतातच नाही तर ज्या-ज्या ठिकाणी भारतीय स्थायिक झालेत त्याही देशात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. पण तुम्हाला माहितीये दिवाळीच्या काळात नेपाळमध्ये चक्क श्वानांची पूजा करून दिवाळी साजरी केली जाते.

Happy Diwali 2017 : कडू रस आणि गोडाचे पोहे; कोकणातील दिवाळीचं हे आहे वेगळेपण!

पुढील वर्षी दिवाळी १९ दिवस उशीरा !

या सणाला ‘कुकुर तिहार’ असं म्हणतात. कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे. आपल्या मालकाची साथ तो शेवटपर्यंत सोडत नाही, मालक अडचणीत सापडला तर त्याच्या मदतीला धावून येतात. म्हणूनच त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेपाळी लोक ‘कुकुर तिहार’ हा सण साजरा करतात. फक्त पाळीव तर नाहीतर भटक्या श्वानांचीदेखील पूजा केली जाते. कुंकू किंवा गुलालाचा तिलक श्वानाला लावला जातो, फुलांच्या माळा घालून नंतर त्याची पूजा केली जाते. त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा भोग चढवला जातो. एखादी दुर्घटना घडणार असेल तर आधीच श्वानाला समजते आणि तो आपल्या मालकाला संकटातून वाचवतो अशी या लोकांची मान्यता आहे म्हणूनच यादिवशी श्वानांना विशेष महत्त्व असते.

https://www.instagram.com/p/BaZGdSOj3C_/

 

Story img Loader