आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती फायदेशीर किंवा किती धोकादायक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी होईल अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत ही शंका कितपत खरी ठरते, हे येणारा काळच ठरवेल, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्हाला स्वप्नवत नोकरी नक्कीच मिळू शकते.

Netflix या ऑनलाइन कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीने एक व्हॅकन्सी काढली आहे. कंपनी AI प्रॉडक्ट मॅनेजर शोधत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल हॉलीवूडमध्ये प्रचंड विरोध होत असताना नेटफ्लिक्सने एआय प्रॉडक्ट मॅनेजरची जागा भरली आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमवर वाढत्या अवलंबून राहत असल्यामुळे संतप्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेटफ्लिक्स देतेय AI प्रॉडक्ट मॅनेजरची नोकरी

नेटफ्लिक्स एआय प्रोडक्ट मॅनेजरच्या पदासाठी ९ लाख डॉलर्सपर्यंत वार्षिक पगार देत आहे, जे सुमारे ७.४ कोटी रुपये आहे. एआय प्रोडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि आशय (कॉन्टेंट) तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.

iहेही वाचा – पोलिसांनी घडवून आणली मायलेकरांची भेट, पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्रींच्या पिल्लांना वाचवले, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

या’ पदासाठीही मोठा पगार

एआय प्रॉडक्ट मॅनेजर व्यतिरिक्त, नेटफ्लिक्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित इतर लोकांची देखील आवश्यकता आहे. कंपनीने टेक्निकल डायरेक्टरची जागा भरली आहे. या पदासाठी कंपनीकडून वार्षिक ४.५ लाख ते ६.५ लाख डॉलर्स पगाराची ऑफर दिली जात आहे. याचा अर्थ नेटफ्लिक्स एका वर्षात ३.७० कोटी ते ५.३५ कोटी रुपये पगार टेक्निकल डाइरेक्टर देईल.

हेही वाचा – तुम्ही रोज किती लिटर पाणी पिता? सलग १२ दिवस महिलेने प्यायले चक्क ४ लिटर पाणी अन्…. वाचा काय आहे प्रकरण

भारतात देखील वापरले जाते AI


देश आणि जगातील अनेक बड्या कंपन्‍या आता आपल्‍या विविध कामांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला आश्चर्यचकीत केले आहे. भारताविषयीच सांगायचे झाले तर, अनेक मीडिया हाऊसने एआय अँकरची ओळख करून दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflixs job post offering seven crore forty lakh annual salary for ai product manager goes viral snk
Show comments