Viral Video: हल्ली लोक फेमस होण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. प्रसिद्धी आणि फॉलोवर्ससाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स नवीन प्रयोग करताना दिसतात. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या इन्फ्लूएन्सर्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, यात अनेक इन्फ्लूएन्सर्स असे असतात, ज्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. पण, यातील बरेच जण असा कटेंट तयार करतात ज्याला काहीही अर्थ नसतो. मात्र, तरीही अनेक मंडळी त्यांचे व्हिडीओ मोठ्या कौतुकाने पाहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर रिल्स बनवणे, डान्स करणे, अभिनय करणे या सर्व गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत. पण, काही इन्फ्लूएन्सर्स असे आहेत जे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करतात. ज्यात ते कधी चित्रविचित्र कपडे घालतात, तर कधी विचित्र मेकअप करतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील तरुणीनेदेखील असंच काहीतरी केलेले पाहायला मिळत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @preetithapasoss अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी भररस्त्यात हिरव्या रंगाच्या साडीत नाचताना दिसत आहे. यावेळी तिचे केस विस्कटलेल्या अवस्थेत पाहायला मिळत असून कपाळावर कुंकू पसरलेले आहे. या तरुणीचा हा लूक हुबेहूब ‘भूल भुलैया’ चित्रपटातील मंजुलिकासारखा दिसत आहे. शिवाय यावेळी ती याच चित्रपटातील ‘आमी जे तोमार’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
हेही वाचा: बापरे! जंगली प्राण्याने पळवला चक्क हत्तीचा कान; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये मंजुलिका गुवाहाटीमध्ये दिसली असं लिहिण्यात आलं आहे. तर व्हिडीओवर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “फेमस होण्यासाठी लोक काहीपण करू शकतात”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “कॅमेरामन नसता तर लोक हिला पाहून पळून गेले असते.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “एवढा आत्मविश्वास कुठून येतो ताई?”
दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून तीन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे.