गाडी चालवताना खूप सावधगिरी बाळगण्याची गरज असते. अन्यथा अपघाताच्या बातम्या तुम्ही रोजच बघतच असाल. गेल्या वर्षी रस्ते अपघातांबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल आला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, जगातील वाहनांपैकी फक्त १ टक्के वाहने भारतात आहेत, परंतु जगात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ११% मृत्यू भारतात होतात. आता तुम्ही समजू शकता की येथे लोक कोणत्या प्रकारचे ड्रायव्हिंग करतात. रस्ते अपघातात नेहमी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांचाच मृत्यू होतो असे नाही, तर त्यांच्यामुळे रस्त्यावरील इतरांनाही जीव गमवावा लागतो. रस्ते अपघातांशी संबंधित व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आधी आश्चर्यचकित व्हाल. कदाचित काहींना हा व्हिडीओ बघून हसूही येईल.
नक्की काय झालं?
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार टेकडीच्या अर्ध्या वाटेवर आहे. त्याच अर्ध्या रस्त्यावर ड्रायव्हर गाडी चालवत आहे. दरम्यान, कार उलटली होते आणि त्यातून एक मुलगी बाहेर येते. तिच मुलगी गाडी चालवत असावी. याशिवाय रस्त्यावरील लोक त्या गाडीतील लहान मुलालाही बाहेर काढण्याचाही प्रयत्न करतात. सुदैवाने कारमध्ये बसलेल्या लोकांना कोणतीही इजा झाली नाही, फक्त कारचे नुकसान झाले.
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सुरुवातीला खूप आश्चर्यचकित करणारा आहे, पण शेवटी काय होते ते पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हा मजेशीर व्हिडीओ bhutni_ke_memes या नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर लोकांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर विविध मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.मुलीचे असे ड्रायव्हिंग पाहून एका यूजरने लिहिले आहे की, ‘मी फास्ट अँड फ्युरियस पाहून आलो’, तर दुसऱ्या यूजरने मजेशीरपणे लिहिले आहे की, ‘देव अशा लोकांना पृथ्वीवर जास्त वेळ ठेवते, कारण ते एकमेव मनोरंजनाचे स्त्रोत आहेत.’