मुलगी आणि वडिलांमधील एक असा क्षण ज्याला बघून सगळ्यांनाच कौतुक करावसं वाटेल अशी एक घटना सोमवारी घडली. दिखा कुमार या सोमवारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये सहाय्यक कमांडंट म्हणून सामील झाल्या हा क्षण तिचे वडील कमलेश कुमार यांच्यासाठी अभिमानाचा होता. कमलेश, जे स्वतः आयटीबीपी अधिकारी देखील आहे. सोमवारी झालेल्या पासिंग आऊट परेड आणि मसुरी येथील आयटीबीपी अकादमीमध्ये प्रमाणिकरण समारंभानंतर त्यांनी अभिमानाने आपल्या मुलीला अभिवादन केले.प्रक्रीतीसह दीक्षा यांना सोमवारी आयटीबीपीच्या सहाय्यक कमांडंटच्या भूमिकेत सामावून घेण्यात आले. यूपीएससी परीक्षेद्वारे आयटीबीपीमध्ये सामील झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना लढाऊ भूमिकेत सामील करण्याची ही पहिलीच वेळ होती.

वडलांनी केले प्रेरित

कार्यक्रमात काढलेले फोटोमध्ये कमलेश छान हसत आपल्या मुलीला दीक्षाला अभिवादन करत आहेत. ITBP च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने “मुलीला अभिमानाने सलाम” अशी कॅप्शनची सुरुवात करत फोटो शेअर केले आहेत. “दीक्षा सहाय्यक कमांडंट म्हणून ITBP मध्ये रुजू झाली. ITBP चे वडील Insp/CM कमलेश कुमार यांनी आज ITBP अकादमी, मसूरी येथे पासिंग आउट परेड आणि प्रमाणिकरण समारंभानंतर तिला सलाम केला.” अशी कॅप्शन देत ‘हिमवीर’ हा हॅशटॅगही वापरण्यात आला. “माझे वडील माझे आदर्श आहेत. त्यांनी मला नेहमीच प्रेरित केले. ”दीक्षा यांनी एएनआयला सांगितले. या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसुद्धा उपस्थित होते. “तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला तिब्बत आणि चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या ITBP ची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.” असे ते एएनआयशी बोलतांना म्हटले.

नेटीझन्सकडूनही कौतुक

आयटीबीपीच्या ट्विटवर कमेंट करताना अनेकांनी दीक्षाला या यशाबद्दल अभिनंदन करत “अभिमानाचा क्षण”, “सुंदर कथा” अशी कमेंट केली आहे. एक युजर कमेंट करतो की, “वडिलांचं हास्य बघून छान वाटलं. दीक्षा तुम्हाला ऑल द बेस्ट” दुसरा युजर कमेंट करतो की, “हा सोनेरी क्षण ज्याची प्रत्येक वडीलांना इच्छा असते.”

तुम्हाला कसे वाटले हे फोटो?

 

Story img Loader