गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घातलेला टांझानियन इन्फ्लुएन्सर किली पॉल याच्या नव्या व्हिडीओने नेटकऱ्यांना थक्क केले आहे. लोकप्रिय भारतीय गाण्यांवर लिप-सिंक करून आणि नृत्य करून किली पॉल भारतातील एक सोशल मीडिया स्टार बनला. काही दिवसांपूर्वी, त्याने यशचा ‘के जी एफ: चॅप्टर २’ चित्रपटाचा डायलॉग पुन्हा तयार करून इंटरनेटवर खळबळ माजवली होती. आता तो एका नव्या व्हिडीओसह परत आला आहे. यामध्ये किलीने ‘बीस्ट’ चित्रपटातील विजय थलापथीचा प्रतिष्ठित अ‍ॅक्शन सीन पुन्हा तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये टांझानियन कंटेंट क्रिएटर किली पॉल चांगलाच रागावलेला दिसत आहे. इंस्टाग्राम रीलमध्ये, त्याने पांढऱ्या शर्टसह काळ्या रंगाचा सूट घातला आहे आणि थलपथी विजयच्या ‘बीस्ट’ चित्रपटातील हिंसक लढाईचे दृश्य कॉपी केले आहे. या व्हिडीओमध्ये किली हातात कुऱ्हाड घेऊन चालताना दिसत आहे. तसेच, या सीनमध्ये तो एका माणसाला कुऱ्हाडीने मारत आहे. केळीच्या अभिनयाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

कुत्र्याला टेनिस खेळताना कधी पाहिलंय का? Viral Video पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित

Viral Photo : १० रुपयाच्या नोटेवर प्रेमीकेने प्रियकरासाठी लिहिला ‘हा’ संदेश; दोन प्रेमींना एकत्र आणण्यासाठी नेटकरी झाले एकजूट

हा व्हिडिओ १ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि याला जवळपास २ लाख लाइक्स मिळाले आहेत. त्याच्या अप्रतिम अभिनय कौशल्याबद्दल अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली.

किली पॉलने ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘राता लांबिया’ गाण्यासाठी त्याची बहीण नीमा पॉलसोबत लिपसिंक करून लोकप्रियता मिळवली होती. त्याला सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रतिक्रिया आल्या होत्या. किली पॉलचे इंस्टाग्रामवर ३.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि बॉलीवूडच्या इतर हिट गाण्यांवरही त्याने रील केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens appreciate kili paul action scene watch this viral video pvp