हवेत उडणारे विमान पाहिले की आपल्याला बालपणाची आठवण येते. लहान असताना जर कुठे विमानाचा आवाज आला किंवा उंच आकाशात उडणारे विमान दिसले तरी आपल्याला जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. कारण तेव्हा त्याबाबत काही माहिती नव्हती, त्यामुळे त्या गोष्टीचे जास्त कुतूहल वाटायचे. जसजसे प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत जाते तसतसे त्याबाबतचे कुतूहल कमी होते. सध्या असाच एक कुतूहल निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक विमान हवेत तरंगताना दिसत आहे.
हा व्हिडीओ ‘वर्ल्ड ‘वर्ल्ड्स बेस्ट रील्स’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान हवेत तरंगताना दिसत आहे. नेमकं हे विमान का थांबवण्यात आले आहे आणि हे असे हवेत का तरंगत आहे असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडतो.
Viral Video : रावणाच्या पुतळ्यातून अचानक येऊ लागले अग्निबाण; जीव वाचवण्यासाठी लोकांनी काय केले पाहा
व्हायरल व्हिडीओ :
बुचकळ्यात टाकणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने विमान असे मधेच थांबण्याचे काय कारण असू शकेल, याचा अंदाज व्यक्त केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत २४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.