सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातील काही पोट धरून हसायला लावणारे तर काही थक्क करणारे असतात. पण सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ या दोन्ही प्रतिक्रिया आपण एकावेळी देऊ असा आहे. या व्हिडीओमध्ये एक फुगा छताला चिकटलेला दिसत आहे. तो फुगा काढण्यासाठी तिथे असणारा व्यक्ती चक्क त्याच्या मुलाला वर फेकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल होणाऱ्या हा व्हिडीओ पाहताना हृदयाचा ठोका चुकतो. कारण जर त्या मुलाला आणखी जोराने वर फेकले असते तर कदाचित त्याच्या डोक्याला दुखापत झाली असती. त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया देत या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर याउलट काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून त्यांना खूप हसायला आल्याचे कमेंट केल्या आहेत. पाहा नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया.
आणखी वाचा : शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी! १९८५ मधील हे हॉटेलचे बिल पाहिले का? किंमत पाहून नेटकरी म्हणाले, ‘एवढ्या पैश्यात…’

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान; मोलकरणीने दिलेली Farewell Party पाहून तुम्हीही व्हाल भावूक

या व्हिडीओला १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens give mixed reactions to viral video father throwing son to fetch a balloon stuck in the ceiling pns