शालेय जीवन म्हणजे सुंदर आठवणीचा खजिना असतो. शाळेमध्ये अभ्यासाबरोबर मौज-मस्ती करण्याची देखील वेगळीच मज्जा असते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणते ना कोणते कौशल्य असते कोणी सुंदर चित्र काढते, कोणी सुंदर डान्स करते तर कोणी सुंदर गायन करते. मुलांमध्ये असलेल्या या कौशल्याला शालेय जीवनामध्येच प्रोत्साहन दिले आणि योग्य मार्गदर्शन केले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. सध्या अशाच एका शाळेतील मुलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डान्स शिक्षक सर्व मुलांना डान्स शिकवत आहे. सर्व विद्यार्थी आपल्या पद्धतीने डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वांमध्ये एक चिमुकला आहे जो अफलातून डान्स करत आहे. चिमुकल्याच्या कौशल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, शालेय गणवेश परिधान केलेले काही विद्यार्थी स्टेजवर उभे राहून कि किली किलीये या तेलगु गाण्यावर डान्स करत आहे. सर्वजण जमेल त्या पद्धतीने नाचत आहे. डान्स टीचर मुलांना गाण्यावरील डान्स स्टेप्स करून दाखवत आहे त्याप्रमाणे मुलं डान्स करत आहे. काही मुलांना नीट नाचता येत नसले तरी तो हा क्षणाचा आनंद घेत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे. दरम्यान एक चिमुकला गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. त्याला गाण्याच्या सर्व डान्स स्टेप्स लक्षात आहेत तो अचूकपणे त्या करत आहे. एवढंच नाही तर नाचताना तो त्या क्षणाचा आनंद घेत आहे. त्याच्या चेहर्‍यावरील हाव-भाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आ

हेही वाचा – पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर niiravs_happyfeet नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहे.
एकाने कमेंट केले की, “हा मुलगा २० वर्षांनंतर सुपरस्टार आहे.”

दुसर्‍याने लिहिले की, “त्या लहान गोंडस मुलाने माझे मन जिंकले”

तिसर्‍याने लिहिले की, ” एक दिवस तो मुख्य प्रवाहात एक्सप्रेशन किंग म्हणून ओळखला जाईल. भविष्यातील प्रभू देवा”

चौथा म्हणाला की “त्याने आपल्या डान्स मधून खरी हिरोगिरी दाखवली आहे”

पाचवा म्हणाला की त्याचे हाव आणि डान्स पाहून खरंच मज्जा आली.

किली किलीये हे गाणे देवरा चित्रपटाच्या पहिल्या भागातील आहे. दाक्षिणात्य अभिनेता ज्यु. एनटीआर आणि बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी चित्रपटा प्रमुख भूमिका साकारली आहे. चिमुकल्याने ज्युनियर एनटीआरप्रमाणे डान्स केला आहे त्यामुळे काही लोकांना चिमुकल्याचा डान्स पाहून ज्युनियर एनटीआरची आठवण येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens react on little boy dance of jr ntr songs kill kill watch the viral video snk