आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. कारण दररोज हजारो लोक इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपणाला थक्क करतात. अशातच एका तरुणाटा असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्याने असा ड्रेस घातला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

काहींनी या तरुणाच्या फॅशनचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याच्यावर विनोदी टिप्पणी केली आहे. देशासह परदेशात सध्या भारतीय मॉडेल आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेदच्या फॅशनची सतत चर्चा सुरु असते. कारण ती दररोज विचित्र आणि आपण कल्पनाही करु शकणार नाही असे ड्रेस घालत असते. तिच्या या ड्रेसवर अनेक लोकांकडून टीकाही केली जाते.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “जराही रोमँटिक नाहीस तू…”, तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

हेही पाहा- “लज्जास्पद…” संपत्तीसाठी वकीलाने वृद्ध महिलेच्या मृतदेहालाही सोडलं नाही; कारमधील ‘तो’ Video पाहून नेटकरी संतापले

अशातच आता एक तरुणाने केलेल्या विचित्र आणि अनोख्या फॅशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय त्याच्या फॅशनचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. Tiktoker Tharun नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन या तरुणाने अनेक विचित्र अशा ड्रेसचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओतील तरुणाची क्रिएटिव्हिटी पाहून अनेकजण थक्क झाले आहे. कारण त्याने अशा गोष्टींपासून कपडे तयार केले आहेत, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करु शकत नाही.

हेही पाहा- “संघाची काळजी…” रिंकू सिंगने ५ षटकार मारुनही केकेआरचा ‘तो’ स्टाफ मेंबर नाराज का? नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला थेट माजी संघ संचालकांनी दिलं उत्तर

अशातच या तरुणाने नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने चक्क गव्हाच्या दाण्यापासून बनवलेला ड्रेस घातला आहे. जो प्लास्टिकवर गव्हाचे दाणे चिकटवून तयार केल्याच दिसत आहे. हा ड्रेस पाहून अनेकांनी त्याच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याच्या ड्रेसची तुला उर्फी जावेदशी केली आहे. या तरुणाने फक्त गव्हाचा ड्रेस नव्हे तर त्याच्या इंस्टाग्रामवर विविध गोष्टींपासून त्याने तयार केलेले ड्रेस पाहायला मिळत आहेत. त्यातील एक ड्रेस तर चक्क लाल मिरचांपासून बनवल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये त्याने भांड्यांपासून ड्रेस बनवल्याचंही पाहायला मिळत आहे.

ड्रेस बनवण्यामागचं सांगितलं कारण –

या व्हिडीओतील तरुणाने आपण अशा प्रकारचे ड्रेस का तयार करतो याचं कारण सांगितल आहे. आपण अनेक निरुपयोगी गोष्टींचा कसा वापर करु शकतो हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या गव्हाच्या ड्रेसचा व्हिडिओ जवळपास १७ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर मिरचीचा ड्रेस सुमारे २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, या ड्रेसची तुलना लोक उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सशी करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

Story img Loader