अ‍ॅपलच्या वार्षिक कार्यक्रमात नवीन उत्पादनांची घोषणा केली जाते. यावर्षी ७ सप्टेंबरला क्युपर्टिनो-कॅम्पसमध्‍ये ॲपलचा ‘फार आऊट इव्‍हेंट’ पार पडला. या कार्यक्रमात अ‍ॅपलकडुन नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रमुख घोषणा करण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या इव्हेंटचे मुख्य आकर्षण होते आयफोन १४. ॲपलच्या या वार्षिक कार्यक्रमात आयफोन १४ लाँच करण्यात आला. या नव्या आयफोनमध्ये सॅटेलाइट नेटवर्कची सुविधा, अधिक फोन स्टोरेज, अधिक प्रोसेसर क्षमता असे अनेक नवे फीचर्स आयफोन १४ मध्ये मिळणार आहेत. नव्या आयफोनची प्रतिक्षा आणि त्याचे फीचर्स जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांना होती. ट्विटरवर मात्र आयफोन १४ लाँच होताच मिम्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. आयफोनच्या सिरीजमधील साम्य, नव्या आयफोनची प्रतिक्षा यावर नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत. हे मिम्स बरेच व्हायरल होत आहेत. पाहूया आयफोन १४ च्या लाँचवर बनवण्यात आलेले आणि सध्या व्हायरल होत असलेले मिम्स.

आणखी वाचा : Apple Event 2022 : iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा; जाणून घ्या भन्नाट फिचर्स आणि किंमत

व्हायरल मिम्स

आणखी वाचा : SBI चा कर्मचारी थेट ‘राजा महाबली’च्या वेषात पोहोचला बँकेत, नेटकरीदेखील अवाक, व्हायरल व्हिडीओची चर्चा

आणखी वाचा : KGF मधील रॉकी स्टाइल गणपतीवरुन वाद; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या नेमकं प्रकरण

नवीन आयफोन लाँचसह ॲप्पल ने आयफोन ११ ची मालिका बंद केली आहे. ज्यांना कमी किमतीत मोठी स्क्रीन आणि बॅटरी हवी असेल, त्यांच्यासाठी नवीन आयफोन १४ प्लस व्हेरियंटमध्ये हे फीचर उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens share hilarious memes on iphone 14 launch see viral ones pns