पाळीव प्राण्यांवर प्रेम करणं अनेकांना आवडतं. पण काही वन्य प्राणीही जीवाल जीव लावून आपल्या राखणदारासोबतची मैत्री घट्ट करतात. जंगलातील काही हिंसक प्राण्यांची माणसांना नेहमी भीती वाटते. परंतु, हत्तीसारखा प्राणी जीवापाड प्रेम करु शकतो, असं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. रानावनात भटकणारे काही हत्ती हिंसकही असतात. पण राखणदार आणि हत्ती या दोघांमध्ये असलेली नाळ कधीच तुटत नाही. कारण एका हत्तीने राखणदाराला पाहिल्यावर त्याच्या गालावर चुंबन घेतलं. हत्तीचं असं प्रेम पाहून राखणदाराचेही डोळे पाणावले. हे संपूर्ण दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हत्तीनं राखदारासाठी दाखवलेलं प्रेम पाहून नेटकरीही भारावले. हत्तीचा हा व्हिडीओ @buitengebieden नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून आतापर्यंत जवळपास ५ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. हत्ती त्याच्या राखणदाराला प्रेमाने जवळ घेऊन चुंबन घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर राखणदाराच्याही भावना दाटून आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. १० डिसेंबर शेअर केलेला या व्हिडीओनं नेटकऱ्यांचीन मनं जिंकली आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

नक्की वाचा – हत्तींसोबत पंगा नाही! सोंडेवर हल्ला केल्यानंतर मगरीला तुडव तुडव तुडवलं, पाहा थरारक Viral Video

इथे पाहा व्हिडीओ

पाच लाखांहून अधिक व्यूज मिळाल्याने या व्हिडीओला पाहण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता वाढताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, “हत्ती खूप स्पेशल असतात.”. “हत्ती माझा सर्वात आवडता प्राणी आहे” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं. तर अन्य एक युजर म्हणाला, “हा सुंदर व्हिडीओ मी दिवसभर पाहतच राहील.” हत्तीचं राखणदारावर असेलेलं प्रेम पाहून लाखो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ दिवसेंदिवस प्रचंड व्हायरल होत आहे.

Story img Loader