Social Media Influencer Viral Video : सोशल मीडियावर दुसऱ्यांचे व्हिडीओ पोस्ट करुन माहिती देणाऱ्या एका जर्मन इन्फ्लूएन्सरचीच चर्चा आता इंटरनेटवर रंगताना दिसत आहे. त्यामागचं कारणही तितकच भयानक आहे. जवळपास ५२ देश फिरणारा हा इन्फ्लूएन्सर भारतात हंगामी वास्तव्यासाठी आला होता. मात्र, रस्त्यावर असणाऱ्या फेरीवाल्यांना आणि फळविक्रेत्यांचा व्हिडीओ काढून त्यांचा अश्लील भाषेत अपमान करण्याचा घाटच या तरुणाने घातला होता. ख्रिस्टियान बेट्झमन असं त्या तरुणाचं नाव असून त्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र, या जर्मनी इन्फ्लूएन्सरच्या बेताल भाषणाचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. फळविक्रेत्यांचा अपमान करणाऱ्या या तरुणाला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल करुन झापलं आहे.
ख्रिस्टियानवर नेटकऱ्यांनी केली सडकून टीका
ख्रिस्टियान ज्या ठिकाणी तात्पुरत्या कालावधीसाठी राहत होता, तेथे असेलेल्या रस्त्यावरील फेरीवाल्यांचा आणि फळविक्रेत्यांचा व्हिडीओ त्याने काढला. त्यानंतर त्याने इंग्रजी भाषेत त्यांना अवमानित केले. हा संपूर्ण भयंकर प्रकार सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पाहिल्यावर ख्रिस्टियानला चांगलेच धारेवर धरण्यात आले. एक फळविक्रेता रस्त्यावर अननसाची विक्री करत असताना खिस्टियान त्यांच्या विरोधात जोरजोरात बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “तुम्ही इतरांप्रमाणे बाजारात जाऊन अननसाची विक्री करा, f***** रस्त्यावर काही करण्याची गरज नाहीय.” अशाप्रकारे उद्धटपणे बोलताना जर्मन इन्फ्लूएन्सर या व्हिडीओत दिसत आहे. तसंच त्याने दोन फळविक्रेत्यांनाही व्हिडीओत कैद केलं आणि ती पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली.
इथे पाहा व्हिडीओ
Just another day of a privileged individual whining about the ways poor people earn their daily bread. from InstaCelebsGossip
ख्रिस्टियानने फळविक्रेत्यांना शिवीगाळ केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. रस्त्यावर फेरीवाले फळ विक्री करायचा काम करतात, पण ख्रिस्टियानने त्यांना अवमानित केल्यामुळं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटलं, हे पाहून मला खूप राग आला. फळविक्रेत्यांचा व्हिडीओ काढून त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रकार या इन्फ्लूएन्सरने केला. पण हे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. विदेशी इन्फ्लूएन्सरला असं कृत्य करण्यापासून आपण थांबवल पाहिजे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, या अशा तथाकथित इन्फ्लूएन्सरकडे जराही विनम्रता राहिली नाहीय.”