बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी मुंबईमधील एका खास सोहळ्यामध्ये प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. नवाजुद्दीनने चित्रपटात बाळासाहेबांची हुबेहूब भूमिका साकारल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत निर्मित हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी नवाजुद्दीच्या अभिनयाची तारिफ केली आहे तर मिनाताई ठाकरेंची भूमिकाही अमृता रावने छान साकारल्याचे म्हटले आहे. असे असतानाचा नेटकऱ्यांनी या ट्रेलरमधील एका संवादावरुन मीम्सचा पाऊसच पाडला आहे. हिंदी ट्रेलरमधील ‘एक संघटन की शुरुवात करनी होगी’ हा संवाद नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की या संवादावरून मीम्सची लाटच आली आहे. पाहुयात व्हायरल झालेले मीम्स.

जेव्हा दोन वर्ष पगारवाढ होत नाही

जेव्हा प्रेयसीचे वडील तुमच्या मित्राला मारतात

भारतीय कोणताही व्हॉट्सअप ग्रुप तयार करताना

प्रत्येक गोवा प्लॅन बनवण्याआधी

प्रत्येक भारतीय विद्यार्थी इंजिनियरींग पूर्ण केल्यानंतर

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी प्लॅनिंग करण्यासाठी

या मीमचे फ्रेण्ड्स कनेक्शन

पहिल्यांदा मास बंकिंग करताना

मी पबजी डाऊनलोड केल्यानंतर

एकटेपणाचा टॅग पुसण्यासाठी

जेव्हा रॅगिंग होते

रस्त्यावरील मारामारीत खूप मार खाल्ल्यानंतर

जेव्हा रिट्टीवट मिळत नाही

बॅकबेंचर्स

जेव्हा वर्गात अनेक धोनीसमर्थक असल्याचे लक्षात येते

जेव्हा तुम्ही एकटेच भुक्कड असता

या सिनेमावरील एका संवादाची इतकी चर्चा झाली असल्याने एकाप्रकारे सिनेमाला प्रसिद्धीच मिळाली आहे. संजय राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader