देशात चहाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकजण चहाचे असे शौकीन आहेत, ज्यांना चहा पिल्याशिवाय करमत नाही किंवा कामात मन लागत नाही. त्यामुळेच आता शहरांमध्ये दिवसेंदिवस चहा विक्रेत्यांची सख्या वाढत आहे. शिवाय चहाचा खपही मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. चहा विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे चहा विक्रेते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाय शोधत असतात. सध्या अशाच एका चहा विक्रेत्याचा अनोखा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील चहा विक्रेता चहा विकताना एकापेक्षा जास्त फिल्मी डायलॉग आणि अनेक कलाकारांची नक्कल करताना दिसत आहे. तो बॉलिवूडच्या कलाकारांची हुबेहूब नक्कल करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओत हा चहा विक्री करणारा तरुण तो अमिताभ बच्चन, हृतिक रोशन आणि अमरीश पुरी यांच्या जुन्या सिनेमांमधील डायलॉग म्हणत ग्राहकांशी संवाद साधताना दिसत आहे. abhinavjeswani नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “देशातील सर्वात टॅलेंटेड चहावाला” असं लिहिण्यात आलं आहे.
हेही पाहा- Video: आई मुलीला म्हणाली “तू मोठी बहीण होणार आहेस”; यावर चिमुकलीने दिलेली प्रतिक्रिया होतेय Viral
नेटकऱ्यांना पडली चहा विक्रेत्याची भुरळ –
हेही पाहा- ड्रायव्हरने भरधाव ट्रकच्या खालून आरपार नेली कार, खतरनाक स्टंटचा Video पाहून चक्रावून जाल
चहा विक्रेत्याचे हे अनोखे टॅलेंट पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी कलाकारांची नक्कल करणाऱ्या चहा विक्रेत्याच्या टॅलेंटचे कौतुक केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून आपणया व्यक्तीच्या हाताचा चहा पिण्यास उत्सुक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.