Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ खूप काही शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की गडकिल्ल्यांवर वस्तू खरेदी करताना भाव का का करू नये? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकिल्ल्यांवर वस्तू खरेदी करताना भाव का का करू नये?

या व्हायरल व्हिडीओ हरीहरगडावरील आहे. हरिहर गडावरील खास वैशिष्ट्ये म्हणजे येथे चढायला चित्तथरारक कातळपायऱ्या आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की खाद्यपदार्थ विकणारी एक महिला डोक्यावर खाद्यपदार्थ घेऊन गड चढत आहे. खाद्यपदार्थ घेऊन कोणताही गड चढणे, खरं तर हे लोक पोटापाण्यासाठी असे जोखमीचे काम करतात. त्यामुळे गडकिल्ल्यांवर वस्तू खरेदी करताना भाव करू नये. अनेक जण या महिलेचा व्हिडीओ सुद्धा बनवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अनेक जण गडकिल्ल्यांवर वस्तू खरेदी करताना भाव करतात. लोकांना वाटते की गडकिल्ल्यांवर वस्तू महाग असतात पण त्यामागील खरं कारण तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळेल. गडावर दररोज सामान वाहून नेणे, किती कठीण असते, हे तुम्हाला व्हिडीओतून दिसून येईल. एक दिवस गड किल्ला चढल्यावर आपल्याला त्रास होतो पण हे खाद्य विक्रेते दररोज गडकिल्ले चढतात, ते पण पोटापाण्यासाठी. त्यामुळे त्यांच्याकडून वस्तू खरेदी करताना कधीही भाव करू नका.

हेही वाचा : एकीकडे पावसाचा कहर दुसरीकडे महिलांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा; ठाणे रेल्वे स्थानकात भयंकर गर्दीचा VIDEO व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “जीव गेला तरी चालेल, तंबाखू खाणं सोडणार नाही” पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाईकस्वाराचा VIDEO व्हायरल, लोक म्हणाले…

__rushi_56 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गडकिल्ल्यांवर गेल्यावर नक्की या कष्टाळू माणसांकडून वस्तू भाव न‌ करता खरेदी करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जे लोक हात धरून चढत आहे घसरत आहे ते जरा डोळे उघडून बघा ही माता कशी बिनधास्त चढत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हिरकणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम त्या माऊलीला” अनेक युजर्सनी या महिलेचे कौतुक केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never bargaining when buying food or things at the forts know reason watch viral video ndj
Show comments