Viral video: आजकाल कुणीही पूर्वीसारखं गॅसवर टोपात पाणी गरम करत नाही. आता शहरात प्रत्येकाच्या घरात गिझर आहेत. प्रत्येक घरात आता अंघोळीसाठी गिझर वापरतात. आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात. मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. गिझरमुळे आग लागल्याचे, गीझरमुळे शॉक लागल्याच्या घटना याआधीही तुम्ही पाहिल्या असतील. दरम्यान तुम्हीही रोज गिझर वापरत असाल तर हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ नक्की बघा. गिझर वापरताना ९९ टक्के लोक काय चुका करतात, त्यात तुम्हीही ही चूक करता का..पाहा
९० टक्के लोक करतात ही चूक
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं तिच्याच घरात घडलेल्या दुर्घटनेबद्दल सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी सांगते, तुम्हीही जर गिझर वापरत असाल तर सावधान..नेहमी गिझर वापरताना काळजी घ्या. गिझर चालू करुन अंघोळीला जाऊ नका तर. अंघोळीला जाण्याआधी गिझर नक्की बंद करा. तुम्ही गिझर चालू करुन जर अंघोळीला गेला तर आतमध्ये बाथरुममध्ये काहीही दुर्घटना व्हायची शक्यता असते. तिच्या घरात सकाळीच अशी दुर्घटना घडली असल्याचं सांगत ती एक धक्कादायक व्हिडीओही दाखवते.
तरुणीनं सांगितला अनुभव
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तिच्या बाथरुममध्ये गिझरला आग लागली आहे आणि सर्वत्र धूर झाला आहे. अशा परिस्थितीत, आत जाण्यापूर्वीच ते ऑन करून पाणी गरम करा आणि आत जाण्यापूर्वीच ते बंद करा. हे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून वाचवेल. गीझरचा मोठा आवाज, आग आणि उकळतं पाणी आजूबाजूला कसं पसरलं हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पोटासाठी चिमुकल्याचा संघर्ष! भाकरी करताना हात भाजला अन् आई आठवली…VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @seetrendinginformation या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.