Viral Video : वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सध्या महाराष्ट्रात आषाढी वारी सुरू आहे. अनेक विठ्ठलाचे भक्त व वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक गावखेड्यातून आणि शहरातून वारीमध्ये सहभागी झाले आहेत. अशात सोशल मीडियावर वारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एका आजोबांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पायाला दुखापत असताना सुद्धा आजोबा वारीत चालताना दिसत आहे. आजोबांची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (never miss pandharpur wari an old man was walking in wari even though his leg was injured)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका आजोबा दिसेल. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांनी पट्टी बांधली आहे पण एवढा त्रास होताना सुद्धा आजोबा वारीत चालताना दिसत आहे.

पंढरीची वारी कधी चुकवायची नाही!

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी आजोबांना विचारते, “बाबा तुम्ही कुठून आलात?” त्यावर आजोबा म्हणतात, “सांगोला” त्यावर तरुणी विचारते, “तुमच्या पायाला काय झाले? चालायला येत नाही तरी का आला तुम्ही? वारी आहे का तुमची? त्यावर आजोबा हो म्हणतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. विठ्ठलभक्त कशाची पर्वा न करता वारीत सहभागी होतात. वारी चुकवायची नाही, हे एकच गोष्ट त्यांना खूप महत्त्वाची वाटते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वृद्ध लोकांचा उत्साह दिसून येणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “जीव गेला तरी चालेल, तंबाखू खाणं सोडणार नाही” पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाईकस्वाराचा VIDEO व्हायरल, लोक म्हणाले…

पाहा व्हायरल व्हिडीओ

tambadeswati या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पंढरीची वारी चुकवायची नाही म्हणून ,पायाला जखम असताना सुद्धा बाबा पायी पंढरपूर ला निघालेत.”

हेही वाचा : ‘अरे हा अंपायर आहे की जोकर’; क्रिकेटच्या मैदानातील त्याच्या करामती पाहून तुम्हीही पोटधरून हसाल, पाहा मजेशीर VIDEO

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”ही आपली खरी परंपरा आहे आणि बाबांनी ती जपली” तर एका युजरने लिहिलेय, “उभ्या जन्मात वारी चुकायची नाही” अनेक युजर्सनी लिहिलेय, “जय हरि विठ्ठल”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never miss pandharpur wari an old man was walking in wari even though his leg was injured watch video goes viral ndj
Show comments