Mobile Charging: मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. बहुतेक कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे. यामुळे काम खूप सोपे होते. बरेच लोक दिवसा फोन चार्ज करतात, तर बरेच लोक फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवतात आणि फोन चार्जिंगला लावून झोपी जातात, सकाळी उठले तर फोन चांगला चार्ज होईल, असे वाटते. त्यात तुम्ही जर तुमचा मोबाईल चार्जिगला लावू बेडवर ठेवत असाल तर आत्ताच सावध व्हा. या सवयीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कधीच तुमचा मोबाईल बेडवर चार्जिंगला ठेवणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्री झोपताना तुम्ही देखील उशीजवळ ठेवता का मोबाईल

काही जणांना तर मोबाईलची सवय इतकी असते की ते झोपताना मोबाईल त्यांच्या उशीजवळ ठेवून झोपतात. रात्री फोन कॉल, मेल, मेसेज तपासण्यासाठी अंथरूणातून उठायला लागू नये यासाठी ते हा पर्याय निवडतात. त्यामुळे दिवसाचा शेवट आणि दुसऱ्या दिवशीची सुरूवात त्यांची मोबाईलच्या दर्शनानेच होते. तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या फोनची SAR व्हॅल्यु तपासू शकता. ज्यावरून तुम्हाला तुमच्या फोनमधील रेडिएशनचे प्रमाण समजू शकते. काही असलं तरी जीवाशी खेळ नको यासाठी रात्री झोपताना फोन जवळ ठेवण्याची सवय त्वरीत बदला.

वेळीच व्हा सावध

मोबाईल बेडवर ठेवून चार्जिंग केल्याचा परिणाम काय झाला हे पाहू शकता. यात गादीला मोठा खोल खड्डा पडलेला दिसतो, त्यात मोबाईल पडला आहे. घटनेत गादीवर ठेवून मोबाईल चार्ज केला जात होता. पण तो इतका गरम झाला, की हळूहळू गादीच जळू लागली. यामुळे फोन गादीच्या आत गाडला गेला. गादीची अवस्था बघून अंदाज बांधता येईल की फोन किती गरम झाला असेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चालत्या ट्रकच्या टायरमध्ये उभं राहून तरुणाचा स्टंट; तोल गेला अन्…VIDEO पाहून उडेल थरकाप

मोबाईल पाहत रात्री झोपल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यावर होण्याची शक्यता असते. जे लोक रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवतात त्यांना जास्त प्रमाणात डिप्रेशन आणि ताणतणावाचा धोका असतो.