Viral video: मोबाईल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही.मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. आजकाल लोक मोबाईल फोन सतत सोबत ठेवतात. कुठेही गेलो तरी आपल्याजवळ मोबाईल असतोच. काहींना किचन आणि बाथरूममध्येही मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते. मोबाईल हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने अनेक वेळा माणसाचा जीव धोक्यात येतो. अनेक गृहिणींना जेवण बनवताना किचनमध्ये मोबाईल वापरण्याची सवय असते. काही जणी मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहून स्वयंपाक करतात. मात्र यामुळे मोठे संकट ओढावू शकते. कारण नुकताच मोबाईमुळे किचनमध्ये स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल वापरता का?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, किचनमध्ये मोबाईल घेऊन जाणे त्या व्यक्तीला महागात पडले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती गॅस बसवण्याचा प्रयत्न करत आहे. तो अनेक वेळा गॅस लावण्याचा प्रयत्न करतो. पण अचानक गॅस गळू लागतो. गॅस गळती होत असल्याचे पाहून त्या व्यक्तीला काहीच समजत नाही. धोक्याची जाणीव झाल्यावर तो गॅस उचलतो आणि स्वतःपासून दूर फेकतो आणि त्याच्या कुत्र्यासह पळून जातो.

ती व्यक्ती तिथून पळून जाताच गॅस वेगाने गळू लागतो. जाता-जाता माणूस मोठी चूक करतो. तो आपला फोन किचनच्या स्लॅबवरच ठेवतो. गॅस गळतीमुळे संपूर्ण स्वयंपाकघरात धूर निघू लागतो. धूर मोबाईलच्या संपर्कात येताच मोठा स्फोट होतो. स्फोटाची ही घटना किचनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कपलची प्री-वेडींग दरम्यान स्टंटबाजी; नवरी डोळ्यासमोर पाण्यात बुडाली, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन किती धोकादायक आहे, हे व्हिडिओ पाहून स्पष्टपणे समोर आले आहे. त्यामुळे किचनमध्ये फोन घेऊन जाणे धोकादायक ठरू शकते. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही घाबरले आहेत. आपली एक छोटीश चूक जीवावर बेतू शकते याचा अंदाज हा व्हिडीओ पाहून येतो. स्वयंपाक घरात झालेल्या स्फोटचा व्हिडीओ @kbkonline नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never use mobile in kitchen radiation from a mobile phone can cause an explosion when it meets on a parallel line with the radiation from a leaking gas cylinder video viral on social media srk