Viral Video : हल्ली मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. एक क्षणही व्यक्ती मोबईलशिवाय राहू शकत नाही. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण मोबाईल वापरतो. असा क्वचितच कोणी असेल ज्याच्याजवळ मोबाईल नाही. मोबाईलसह अनेक जण सतत कानात हेडफोन घालून असतात. यामुळे कानाच्या आरोग्याला धोका असतोच पण त्याचबरोबर काही वेळा आपल्याबरोबर अपघात सुद्धा घडू शकतो.

अनेक जण रस्त्याने कानात हेडफोन घालून व हातात मोबाईल घेऊन चालतात. पण रस्त्याने चालताना हेडफोन किंवा मोबाईलचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी कानात हेडफोन घालून मोबाईलकडे बघत रस्ता ओलांडत असते तितक्यात अचानक एक बस येते. पुढे या तरुणीबरोबर काय घडते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (never use phone or headphones while walking on road life will not give second chance to everyone shocking video viral)

हेही वाचा : पुण्यात टोळक्यांचा थरार! आयटी इंजिनिअरच्या कुटुंबावर ४० जणांचा हल्ला; रात्रीच्या काळोखात रॉड, दगड अन् काठ्या घेऊन पाठलाग

आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी रस्ता ओलांडताना दिसेल. कानात हेडफोन घालून मोबाईलकडे बघत ती रस्ता ओलांडताना दिसते पण अचानक बस आडवी येते. तरुणीला पाहून बसचालक लगेच ब्रेक मारतो आणि ती तरुणी थोडक्यात वाचते. कानात हेडफोन असल्यामुळे तिला काहीही ऐकू येत नाही आणि तिचे संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असते. या व्हिडीओवर लिहिलेय, “रस्त्यांनी चालताना हेडफोन आणि मोबाईलचा वापर टाळावा.” रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची दुसरी संधी देत नाही.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : ‘याच त्या 2G चा काळ गाजवणाऱ्या तरुणी’; ‘झाला हल्ला हल्ला…’ गाण्यावर केला होता जबरदस्त डान्स; तुम्हाला आठवतोय का हा VIDEO

roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरून रस्ते सुरक्षेसंदर्भात अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक अपघात घडले आहे. मोबाईलच्या नादात अनेकांनी जीव गमावले आहे. हल्ली रिल्स सेल्फीच्या नादामुळे सुद्धा अनेक लोक जीव गमावतात. त्यामुळे मोबाईलचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.