नवीन कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक दिवस रात्र मेहनत घेत असतात. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काही जण खूप कष्ट करतात. प्रत्येकासाठीच त्यांचं हे स्वप्न खूप खास असतं. तसंच आजकाल अपघातांचं प्रमाणही इतकं वाढत चाललंय की, नवीन कार घेताना कोणती कार घ्यावी आणि कार घेतल्यावर त्याची कशी काळजी घ्यावी, इथपासून अनेक प्रश्न पडतात. त्यात ड्रायव्हिंग स्किल जर उत्तम असेल तर माणूस निर्धास्त असतो, पण कोणी शिकाऊ असला आणि त्याने नवीकोरी गाडी कुठे ठोकली, तर झालाच ना अपघात.

नव्या गाडीबरोबर असा अपघात होणं कोणाला सहन होण्यासारखं आहे? कोणालाच नाही, बरोबर ना…, सध्या असाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय, जिथे नुकत्याच शोरूममधून आणलेल्या नव्याकोऱ्या कारचा अपघात झाला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

नव्याकोऱ्या कारचा अपघात

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक नवीकोरी कार रस्त्यावरून येताना दिसतेय. पण, या कारची अवस्था काही नव्यासारखी राहिली नसून या कारचे हेडलाईट फुटलेले दिसतायत. तसंच गाडीचा अपघात झाल्यामुळे कारचं खूप जास्त नुकसान झाल्याचं दिसतंय. गाडी घेतल्या घेतल्या एवढा मोठा अपघात पचवणं सोप्प काम नाही, त्यामुळेच या गाडीमालकाला त्याचं खूप दुःख झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. कारमालक रस्त्याच्या कडेला खाली बसून रडताना या व्हिडीओमध्ये दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kulk___ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पुण्यात शोरूममधून नवीन कार घेतली आणि अपघात झाला” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं नशीब कोणाच्याच वाट्याला येऊ नये”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “वाईट वाटून घेऊ नका, असा विचार करा की तुमचे संकट कारने झेलले.” तर तिसऱ्याने “मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय, पण विम्याचा वापर करून तु्हाला १० दिवसात नवी कार मिळू शकते, त्यामुळे काळजी करू नका” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader